मुंबई : काल गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे
रुपाली पाटील ठोंबरे नेमकं काय म्हणाल्या?
यासंदर्भात रुपाली पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘ज्या पक्षात सर्व जातीचे,धर्माचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री आहेत. तिथे जातीवाद कसा असेल? असूच शकत नाही,’असे रुपाली म्हणाल्या.
[read_also content=”शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं, भाजप जवळच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ https://www.navarashtra.com/maharashtra/sharad-pawar-should-be-the-prime-minister-excitement-due-to-statements-made-by-leaders-close-to-bjp-nrdm-263473.html”]
दरम्यान, ‘१९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. परंतु, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवले. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार. आपणच जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असू तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता.’ तसेच राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार आहे, असे राज ठाकरे काल पार पडलेल्या जाहीर सभेत म्हणाले होते.