
General Secretary Rajabhau Chaugule left MNS chief Raj Thackeray and joined Eknath Shinde Party
राज ठाकरे यांनी मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी आणि मराठी मतांसाठी उद्धव ठाकरेंसोबत युती केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची सर्वत्र जोरदार चर्चा देखील झाली आहे. मात्र याचे रुपांतर मतदानामध्ये किती होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र निवडणुकीच्या ऐन मैदानामध्ये मनसेचे शिलेदार हे राज ठाकरेंची साथ सोडून जाताना दिसत आहेत. राज ठाकरेंना यांना सकाळापासून दोन महत्त्वाच्या नेत्यांनी राम राम ठोकला असून या सर्व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत केलेल्या या युतीमुळे नेते मनसेची साथ सोडत असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : राज साहेबांची हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती…! कमळ हाती घेताच संतोष धुरींनी केली आगपाखड
सकाळी मनसेचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेल्या संतोष धुरी यांनी पक्षाची साथ सोडली. संतोष धुरी यांनी कमळ हाती घेतल्यानंतर राज ठाकरेंवर आगपाखड केली. यानंतर आता राज ठाकरेंना आणखी एक नवा धक्का बसला आहे. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि सरचिटणीस राजाभाऊ चौगुले यांनी राज ठाकरेंची साथ सोडत एकनाश शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजाभाऊ चौगुले यांच्यासह मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ऍड.देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर, संतोष यादव यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे मनसेला ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला असून शिवसेनेची ताकद वाढली आहे.
हे देखील वाचा : डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे अपहरण करतील? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
कोण आहेत राजाभाऊ चौगुले?
विद्यार्थी सेनेपासून राजाभाऊ चौगुले हे राज ठाकरे यांच्यासोबत काम करत होते. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राजाभाऊ चौगुले यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी मनसेत बरीच वर्ष काम केलं. मनसेतून पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या तिकीटावरून नगरसेवक म्हणून निवडूनही आले होते. त्यानंतर ते महापालिकेत विधी समितीचे अध्यक्षही झाले होते.
राजाभाऊ चौगुले हे चेंबूर- टिळकनगर परिसरातले. पण त्यांनी घाटकोपरमधून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर राजाभाऊ चौगुले यांनी परत मनसेत प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे. यामुळे राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.