Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी डॉ.सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

कुठल्याही लेखकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणं म्हणजे त्यांच्या लेखनाचा सर्वोच्च सन्मान होणं. हाच पुरस्कार डॉ.सुधीर रसाळ याना मिळाला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 19, 2024 | 09:38 PM
‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी डॉ.सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी डॉ.सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Follow Us
Follow Us:

मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्क पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार आज म्हणजेच 18 डिसेंबर 2024 ला जाहीर करण्यात आला.

अकादमीचे सचिव, के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2024 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 21 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं थेट PM नरेंद्र मोदी आणि CM फडणवीसांना पत्र; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर

डॉ.सुधीर रसाळ यांच्याविषयी माहिती

डॉ.सुधीर रसाळ हे मराठीतील मान्यवर समीक्षक आणि लेखक आहेत. त्यांनी 1956 पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व करणारे रसाळ हे औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे 1990 ते 1993 या काळात प्रमुख होते. साहित्य लेखन, समीक्षा आणि संपादन या क्षेत्रांत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

ग्रंथसंपदा

डॉ.रसाळ यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये कविता आणि प्रतिमा, कविता निरूपणे, मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण, ना.घ. देशपांडे यांची कविता यांसारख्या ग्रंथांचा समावेश आहे. त्यांचे लेखन वाङ्मयीन जाणिवा, शैली, आणि संस्कृती यावर विशेष प्रकाश टाकते.

पुरस्कार आणि मानसन्मान

डॉ. रसाळ यांना आपल्या उत्कृष्ट लेखांच्या जोरावर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये अशोक कीर्तकीर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार, गौरवमूर्ती पुरस्कार, आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे. 2021 साली त्यांना अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोल्हापुरात जप्त केलेलं वाहन सोडवण्यासाठी केली ‘इतक्या’ रकमेची मागणी; API वर गुन्हा दाखल

ज्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्याविषयीची माहिती

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या ‘विंदाचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकाला प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात सैद्धांतिक समीक्षेचा अभाव अधोरेखित करणारे हे पुस्तक साहित्य आणि वाङ्मयविषयक अनेक प्रश्नांना समर्थ उत्तरे देते.

डॉ. रसाळ यांनी त्यांच्या समीक्षेत वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा, तिच्या घटकांच्या परस्पर संबंधाचा आणि तिच्या मूल्यमापनासाठी योग्य निकष तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी समीक्षेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात काही निवडक समीक्षकांनीच अशा प्रकारचे सैद्धांतिक अभ्यास सादर केले आहेत. बा.सी मर्ढेकरांनी यांनी सर्व ललित कलांबाबत सिद्धांत मांडला, त्यानंतर विंदा करंदीकर यांनी वाङ्मयकलेच्या जीवनाविधी कलेवर आधारित वेगळा सिद्धांत मांडला.

परंतु करंदीकरांच्या या सिद्धांताला अपेक्षित मान्यता मिळाली नाही. त्यांच्या समीक्षेत केवळ सिद्धांत नव्हे, तर समग्र काव्यशास्त्र निर्माण करण्याची क्षमता होती. डॉ.रसाळ यांनी या पुस्तकातून पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैध्दांतिक समीक्षा मांडली आहे.

Web Title: Sahitya akademi award announced to dr sudhir rasal for his book vindanche gadyarup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 09:38 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Sahitya Akademi Award

संबंधित बातम्या

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
1

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
2

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
3

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.