सह्याद्रि सहकारी साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज
कारखान्याचे प्रेरक, देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण, संस्थापक आदरणीय पी. डी. पाटील यांच्या विचारांचा व सहकाराच्या मूल्यांचा वारसा जोपासत सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सुरू आहे. राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तथा सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी जोरदार तयारी केली आहे.
चालू सन २०२६-२७ च्या गळीत हंगामात प्रतिदिन ११ हजार मेट्रिक टन व त्याहीपेक्षा अधिक क्षमतेने ऊस गाळप करण्याच्यादृष्टीने ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे. हंगाम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी कारखाना प्रशासनाने पूर्ण केली आहे. दरम्यान, ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा, ऊसतोडणीच्या टोळ्या कारखाना कार्यस्थळावर व शेती विभागीय कार्यालयांतर्गत विविध गावांमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना गळीत हंगामासाठी सर्वतोपरी सज्ज झाला आहे.
कार्यस्थळावर दाखल झालेल्या ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेला ज्या त्या विभागीय कार्यालयांतर्गत बसविण्याचे काम करतेवेळी यशवंतनगर विभागीय कार्यालय प्रमुख वाय. पी. साबळे, फिल्डमन एम. एच. मोरे, फिल्डमन एस. वाय. पवार, संजय चव्हाण, डी.जी. सरगडे, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र पाटील, वायदंडे, आतकरे आदी उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेला चांगली परंपरा
सह्याद्री कारखानाच्या सर्वसाधारण सभेला चांगली परंपरा आहे. वार्षिक सभा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात झाली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या श्रद्धांजलीचा ठराव सुरू असताना विरोधकांनी गोंधळास सुरुवात केली. सभेत प्रश्न असतात. खुलासे आपण करतो. या स्थितीत विरोधकांनी बाजार मांडला. या गोंधळात सह्याद्रीच्या सभासदांनी संयम ठेवला. विरोधकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरेच ऐकायची नव्हती तर केवळ नावाप्रमाणेच उत्तुंग चाललेल्या सह्याद्री कारखान्यावर फक्त टीका करायची होती. प्रतिसभा घेऊन प्रक्षोभीत भाषणे करता, अनेक वल्गना करता. त्याला योग्य वेळी उत्तर देऊच.






