Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सह्याद्रीत पावसाळी भटकंतीचा हंगाम सुरू; सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन, पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

Sahyadri monsoon, Pune monsoon travel AMGM guidelines : मान्सूनमध्ये सह्याद्री पर्वतरांग हिरवाईने नटली असून धबधबे आणि निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र निसरड्या वाटा, दरडी कोसळण्याचा धोका आणि वेगवान पाण्याचे प्रवाह यामुळे सुरक्षिततेचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे गिर्यारोहण महासंघाने आवाहन केले आहे

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 24, 2026 | 08:19 PM
सह्याद्रीत पावसाळी भटकंतीचा हंगाम सुरू; सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन, पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
Follow Us
Follow Us:
  • सह्याद्रीत पावसाळी भटकंतीचा हंगाम सुरू
  • सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन
  • पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
सुनयना सोनवणे

पुणे: मान्सूनच्या आगमनामुळे सह्याद्री पर्वतरांग हिरवाईने नटत आहे. धबधबे, ओढे आणि नाले प्रवाहित होत आहेत. या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आणि ट्रेकर्स सह्याद्रीकडे आकर्षित होत असताना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने (एएमजीएम) केले आहे.

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना पालिकेकडे हस्तांतरित

महासंघाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पावसाळ्यात निसरड्या वाटा, दाट धुके, कमी दृश्यमानता, वेगवान पाण्याचे प्रवाह, दरडी कोसळण्याचा धोका आणि अचानक बदलणारे हवामान यामुळे अपघातांची शक्यता वाढते. धबधब्यांच्या प्रपाताखाली जाणे, धोकादायक कड्यांवर सेल्फी घेणे, पाण्याच्या प्रवाहात उतरून साहस करणे किंवा अपरिचित भागात भटकणे यामुळे दरवर्षी अनेक दुर्घटना घडत असल्याचे महासंघाने नमूद केले आहे.

राज्यातील विविध गिर्यारोहण संस्था आणि स्वयंसेवक बचावकार्यात कार्यरत असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (एमएमआरसीसी) हे आपत्कालीन बचावकार्याचे समन्वय केंद्र म्हणून काम करत आहे.

खिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष, उमेश झिरपे म्हणाले की, ‘सह्याद्रीतील पावसाळा हा निसर्गाचा अद्भुत अनुभव आहे. मात्र, साहस करताना सुरक्षिततेची चौकट विसरता कामा नये. पर्यटकांनी जबाबदारीने वर्तन केल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. सह्याद्रीचा आनंद घ्या; पण सुरक्षिततेची तडजोड करू नका.’

आपत्कालीन मदतीसाठी

महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर
२४x७ हेल्पलाईन : ७६२०-२३०-२३१

पावसाळी भटकंतीत काय करावे?

  • अनुभवी आणि ओळखीच्या गटासोबत ट्रेकला जावे.
  • हवामानाचा अंदाज तपासूनच नियोजन करावे.
  • प्रथमोपचार पेटी, टॉर्च, पॉवर बँक व सुरक्षा साहित्य सोबत ठेवावे.
  • ट्रेकची माहिती कुटुंबीयांना द्यावी.
  • आवश्यक असल्यास स्थानिक वाटाड्याची मदत घ्यावी.
  • गटशिस्त पाळून लीडरच्या सूचनांचे पालन करावे.
  • किल्ले, निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा जपावा.

पावसाळी भटकंतीत काय करू नये?

  • एकट्याने ट्रेक किंवा भटकंती करू नये.
  • धोकादायक कडे, तटबंदी किंवा बुरुजांवर सेल्फी घेऊ नयेत.
  • धबधब्यांच्या प्रपाताखाली किंवा जोरदार पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये.
  • मद्यपान करून साहस करू नये.
  • धुक्यात किंवा अपरिचित भागात एकटे जाऊ नये.
  • विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या जागेत थांबू नये.
  • किल्ल्यांवर कचरा टाकू नये.
  • ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करू नये.
  • सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालणारे स्टंट करू नयेत.
PCMC News: महापौरांसाठी ३० लाख तर आयुक्तांसाठी १९ लाखांची कार; PCMC चा थेट खरेदीचा निर्णय चर्चेत

Web Title: Sahyadri monsoon trekking safety guidelines amgm warning maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • guide
  • Maharashtra. Pune
  • travel news
  • Trekking

संबंधित बातम्या

युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम
1

युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमानाचा अपघात; विमान कोसळल्याने परिसरात खळबळ
2

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमानाचा अपघात; विमान कोसळल्याने परिसरात खळबळ

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई
3

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या
4

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.