Sambhaji Brigade state president Pravin Gaikwad Ink thrown Akkalkot News Update
Pravin Gaikwad Ink thrown : अक्कलकोट : अक्कलकोटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. मात्र गाडीतून उतरल्यानंतर त्यांच्यावर शाही फेक करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं असल्याचे सांगितले जात आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटच्या दौऱ्यावर होते. ते फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ही घटना घडली. कार्यक्रमस्थळी पोहचताच प्रवीण गायकवाड यांच्यासमोर अनेकजण आले. अचानक जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्षरशः शाई पूर्णपणे ओतली. जमावाने प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं. यामुळे अवघ्या काही क्षणात त्या ठिकाणी गदारोळ निर्माण झाला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संभाजी ब्रिगेडच्या नावावरुन वाद निर्माण झाला आहे. संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख असल्यावरुन वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. यापूर्वी देखील त्यांनी संभाजी ब्रिगेडला इशारा दिला होता. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचादेखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते. संघटनेचे अध्यक्ष अक्कलकोटमध्ये आल्यानंतर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात दोन संभाजी ब्रिगेड आहेत. प्रवीण गायकवाड हे दुसऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्रभर दौरे करत असतात. ते आज अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमस्थळी दाखल होत असतानाच शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते तेथे जमा झाले आणि गायकवाड यांना काळे फासण्यात आले. काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाड हे कारमध्ये जाऊन बसले. मात्र शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी कारमध्ये घुसून गायकवाड यांना मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावरही त्यांना मारहाण झाल्याचे समोर आले.