महाराष्ट्रात ३२८ नवीन मद्य परवाने देण्याच्या महायुतीच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाड संतापले. (फोटो - iStock)
Jitendra Awhad Political News : मुंबई : राज्याचा महसूल वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून आणखी 328 नवीन मद्यविक्री परवाने देण्यात येणार आहे. मात्र हे नवीन परवाने दुकानांना नव्हे तर कंपन्यांना दिले जाणार आहेत. प्रत्येकी एका कंपनीला मद्यविक्रीचे 8 परवाने दिले जातील. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. तसेच राज्यात जुना मद्यविक्री परवाना विकत घेण्यासाठी 10 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. तर नवीन परवाना घेण्यासाठी कंपन्यांना राज्य सरकारला फक्त एक कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. या निर्णयामुळे राज्याचा महसूल वाढणार असला तरी राज्यातील तळीराम देखील वाढणार आहेत. यामुळे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोष व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘लाडक्या बहिनींच्या नावाखाली त्यांचा संसार उद्धवस्त करण्यचा काम सुरू आहे. या सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. अर्थव्यस्थेचा खेळखंडोबा सुरू आहे. बहिणींना पैसे देण्यासाठी त्यांच्या पती, भाऊ यांना बेवडे करण्याचं काम सुरू आहे. वाजले की बारा, वाजले की बारा असं म्हणायची वेळ आली आहे.’ असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, या सर्व 47 कंपन्या कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे. तुम्हाला मद्याची नाही तर सत्तेची झिंग आली आहे. महाराष्ट्र हा येड्यांचा बाजार नाहीये. माझ्या बहिणींना पैसे देण्यासाठी दारू परवाना देत आहे. हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा, साधू संतांचा आहे की बेवड्यांचा आहे? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. दारूड्याचं सरकार आहे का, बेवड्याचं सरकार आहे? आता चपट्या खिशात घेऊन फिरण्याची मुभा द्या. मी विधानसभेत घेऊन जाणार आहे. पाणी नाही मिळाले तर चालेले मात्र दारू घरात मिळणार. हे सरकार मॅकडॉलन्सची सरकार आहे. दत्ता भरणेंना सांगा लाडक्या बहिनींना घेऊन जा आणि चंद्रभागेत जाऊन ढकलून द्या. पैसे कमवायचे आहेत तर गेट ऑफ इंडिया विका, किल्ला विका, असा आक्रमक पवित्रा जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, हे म्हणजे लाडक्या बहिणीच्या संसाराला हातभार लावण्यासाठी “दाजीं”ना मद्यपी म्हणजेच दारुड्या किवा बेवडा करून तीच्या संसारात राख कालवणे, असे लिहित जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“लाडकी बहिण” योजनेच्या मोठ्या खर्चातून सावरण्यासाठी महसूल वाढीचे नवे पर्याय शासनाकडून शोधले जात आहेत. त्यातूनच राज्य उत्पादन शुल्क (StateExcise) खात्याच्या उत्पन्न वाढीसंबधात नेमलेल्या समितीने नवीन मद्य विक्री परवाने (जे ५० वर्षे स्थगित होते) देण्याचे ठरवले आहे.
त्यामुळे महसुलात…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 13, 2025