Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्ग बस अपघातातील मृतांवर आज बुलडाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार, नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा

या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात होरपळले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलढाण्यात त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 02, 2023 | 09:44 AM
समृद्धी महामार्ग बस अपघातातील मृतांवर आज बुलडाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार, नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा
Follow Us
Close
Follow Us:

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) बुलढाण्यात झालेल्या अपघाताने महाराष्ट्र हादरून गेला आहे. या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या मृतांचा अक्षरश: कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. त्यामुळे आज त्यांच्यावर बुलडाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार केले जाणार आहे. बुलडाण्यातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. यातच आता अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू आहे. मन हेलावणारी अशी दृश्य याठिकाणी पाहायला मिळत आहेत.

[read_also content=”ट्विटरचा पुन्हा नवा नियम! आता Twitter वर दिवसाला वाचता येणार फक्त 600 पोस्ट https://www.navarashtra.com/india/twitter-new-rule-now-only-600-posts-can-be-read-per-day-on-twitter-nrps-426148.html”]

या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात होरपळले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांशी चर्चा करून रविवारी बुलढाण्यात त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, समृद्धी मार्गावरील अपघात हा दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि वाहनचालकांना आलेली डुलकी आदी कारणामुळे घडतात. असे अपघात घडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक व प्राधान्याने करण्यात येतील.

‘समृद्धीवरचे अपघात जास्तीत जास्त मानवी चुका, चालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. असे अपघात होऊन चालणार नाही. आपल्याला प्रत्येक जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने प्रकरण गांभिर्याने घेतलं आहे. सगळी यंत्रणा जागेवर पोहोचली मात्र दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही. अपघात होऊ नये म्हणून सरकारला काही करायला हवं ते सरकार करेल,’ असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.

कसा झाला अपघात ?
विदर्भ टॅव्हल्सची (Vidharbh Bus Accident)  खासगी बस नागपूरहून पुण्याकडे (Pune) निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. मध्यरात्री 1.30 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ बसचा भयंकर अपघात झाला. बस आधी एका खांबाला जावून आदळली आणि त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. डीझेल टाकी फुटल्याने बसने पेट घेतला.

आगीने बघात बघता रौद्ररूप धारण केलं. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. बसमधील 26 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या बसचा एक चालक दगावला आहे. तर दुसरा चालक शेख दानिश शेख इस्माईल हा बचावला आहे. (Buldhana Bus Accident)

Web Title: Samriddhi highway bus accident dead mass cremation today in buldana nrps bus accident update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2023 | 09:44 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • DNA testing

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
2

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
3

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
4

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.