Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हा भारतीय संघाचा खात्रीशीर विजय..! T20 विश्वविजेता संघाचे CM देवेंद्र फडणवीसांनी केले अभिनंदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच उत्तम कामगिरीसाठी कौतुक केले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 09, 2026 | 03:14 PM
Maharashtra CM Devendra Fadnavis congratulates Indian cricket team for winning T20 World Cup

Maharashtra CM Devendra Fadnavis congratulates Indian cricket team for winning T20 World Cup

Follow Us
Follow Us:
  • भारताने T20 वर्ल्ड कप 2026 चे जेतेपद पटकावले
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले
  • तसेच भारतीय खेळाडूंच्या खेळीचे देखील कौतुक केले
मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने रविवार, ८ मार्च रोजी न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय मिळवत टी-२० विश्वचषक २०२६ (T20 World Cup) जिंकला. भारताने न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना, किवी संघ त्यांचे पूर्ण २० षटके पूर्ण करू शकला नाही आणि त्यांना १५९ धावांतच गुंडाळण्यात आले. ९६ धावांनी सामना जिंकून, भारताने केवळ T20 वर्ल्ड कप जिंकला. भारतीय संघाच्या या कामगिरीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भारतीय संघाचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले असून भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘वर्ल्ड चॅपियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारतीय टीमने भारताचा तिरंगा फडकवला आहे. भारत पुन्हा चॅपियन झाला आहे. आणि काल अनेक रेकॉर्ड तोडत ज्या प्रकारे न्यूझीलंडचा पराभव हा भारतीय संघाने केला, T20 सामन्याच्या इतिहासामध्ये फायनलमध्ये अशाप्रकारचा स्कोर करणं आणि समोरच्या टीमला अशा पद्धतीने गारद करणं हा देखील एक नवीन रेकॉर्ड आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीसांनी भारतीय संघाचे कौतुक केले.

हे देखील वाचा : “पत्नीला कानशिलात मारणे क्रूरता नाही…”, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काय आहे प्रकरण?

पुढे ते म्हणाले की, “कालच्या मॅचमध्ये विशेषतः संजू सॅमसंग असतील, अभिषेक शर्मा असतील यांनी ज्या प्रकारे बॅंटिग केली त्यामुळे एक अतिशय मजबूत संघटना हे भारताला मिळालं. आणि बॉलिंगमध्येही जसप्रीत बुमराह यांनी ज्याप्रकारे पूर्ण सिरीजमध्ये अतिशय इकॉनॉमिने बॉलिंग केली. आणि कालही त्यांनी ज्या प्रकारे न्यूझीलंडच्या टीमला गारद केलं. विलषण पद्धतीचे त्यांचं कार्य आणि बॉलिंग आपल्याला पहायला मिळाली आहे. अर्थात एकूण टीमचा परफॉर्मन्स हा अतिशय उत्तम राहिला आहे. या सिरीजमध्ये केवळ एक सामना आपण हारलो, बाकी कोणत्याच सामन्यामध्ये पराजित झालो नाही. एक खात्रीशीर विजय भारतीय संघाने मिळवून दिला. त्यामुळे सुर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीमचे मी अतिशय अभिनंदन करतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा :  इशानची गर्लफ्रेंड तर सुर्याची बायको… नजर टाका विश्वचषकाच्या फायनलच्या दिनी खेळाडूंचे परिवारासोबत खास क्षण!

आयसीसी टी20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल कर्णधार सूर्यकुमार यादव व संपूर्ण टीम इंडियाचे मनःपूर्वक अभिनंदन! आईसीसी टी20 वर्ल्ड कप जीतने पर कप्तान सूर्यकुमार यादव और पूरी टीम इंडिया को हार्दिक बधाई! (मुंबई | 9-3-2026 )@surya_14kumar @Jaspritbumrah93 @BCCI #Maharashtra #Mumbai… pic.twitter.com/hzUzFabZXg — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 9, 2026

फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे केले कौतुक 

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि म्हटले की, “आज भारताची जागतिक स्थिती पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत आहे. “टॅरिफ वॉर” चा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की जग आर्थिक आणि व्यापारी दबावांना तोंड देत असताना भारत अढळ राहिला. फडणवीस यांच्या मते, पंतप्रधान मोदींनी भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित केली आहे, ज्यामुळे देश कोणत्याही आंतरराष्ट्रीय आव्हानाला तोंड देऊ शकतो. त्यांनी विरोधकांची टीका “हास्यास्पद” म्हणून फेटाळून लावली.

Web Title: Maharashtra cm devendra fadnavis congratulates indian cricket team for winning t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • 2026 T20 Cricket World Cup
  • cricket news
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

IND Vs AUS: कांगारूंचा अहंकार चक्काचूर! बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी थरारक विजय
1

IND Vs AUS: कांगारूंचा अहंकार चक्काचूर! बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी थरारक विजय

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! मंत्रालयीन विभागांची होणार पुनर्रचना, प्रशासकीय विभागांची संख्या वाढणार
2

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! मंत्रालयीन विभागांची होणार पुनर्रचना, प्रशासकीय विभागांची संख्या वाढणार

ठाणेकरांसाठी खुशखबर ! गायमुख ते फाउंटन बोगद्याला मान्यता, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालादेखील मंजुरी
3

ठाणेकरांसाठी खुशखबर ! गायमुख ते फाउंटन बोगद्याला मान्यता, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालादेखील मंजुरी

Nashik Politics: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा कायम; गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे लक्ष
4

Nashik Politics: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा कायम; गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.