Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Budget 2026: महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ! जल माहिती केंद्र उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारचा सादर केलेला अर्थसंकल्पाचे विशेष कौतुक केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 08, 2026 | 10:00 PM
महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ!

महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ!

Follow Us
Follow Us:

राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सादर केलेला महायुती सरकारचा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत राज्याचे जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी व्यक्त केले. राज्यातील सिंचन प्रकल्प आणि नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी अर्थसंकल्पातून दिलेल्या पाठबळाचे त्यांनी स्वागत केले. तसेच नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र उभारण्याचा निर्णयही अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अर्थसंकल्पाबाबत बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान Narendra Modi यांच्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभाग सातत्याने पाठपुरावा करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील सर्व नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याची घोषणा आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

३२ हजार ७५६ कोटींची तरतूद शेतकऱ्यांसाठी दिलासादायक

महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर, मागेल त्याला सौर कृषीपंप योजना तसेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी तब्बल ३२ हजार ७५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

जागतिक बँकेच्या मदतीने २२४० कोटींचे प्रकल्प

सन २०४७ पर्यंतच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर आणि शहरी भागात दरडोई १३५ लिटर पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने २२४० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच कृष्णा खोऱ्यातील पूरपाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळविण्याच्या घोषणेचेही त्यांनी स्वागत केले.

याशिवाय जलसंपत्तीची डिजिटल प्रमाणित आणि ऑनलाइन माहिती उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र उभारण्यासाठी ७१.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याबरोबरच एकल महिलांसाठी विशेष धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २५ लाख ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट आणि बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासाला मिळणार नवी दिशा

शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती देणे, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आध्यात्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठीही या अर्थसंकल्पातून महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वाटचाल करत असून पुढे ती पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. उद्योग क्षेत्रात ५० हजार स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेली तरतूद राज्यात रोजगारनिर्मितीस चालना देणार असल्याचा विश्वासही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: Radhakrishna vikhe patil on maharashtra budget 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 09:48 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra budget session
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
2

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
3

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
4

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.