मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा आपपल्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा असल्याचे वातावरण केले होते. राज्यातील सत्तातरानंतर शिवसेना व शिंदे गटासाठी कालचा पहिलाच दसरा मेळावा होता. दरम्यान, दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका तसेच राजकारण होताना सर्वांनी पाहिले. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा झाला, तर बीकेसीत (BKC) शिंदे गटाचा दसरा मेळावा झाला. त्यामुळ कोणत्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होती. कोणाचे भाषण गाजले यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत. तसेच राजकीय नेत्यांकडून दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया येत आहेत, दरम्यान, आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर बोचरी टिका करत काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहेत.
[read_also content=”‘शिमग्यामध्ये’ फक्त बोंबाबोंब होते…देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/devendra-fadnvis-reaction-on-udhav-thackeray-shivsena-dasara-melava-333211.html”]
फक्त गद्दार…खंजीर..आणि खोके
दरम्यान, बाळासाहेबांनी शिवतीर्थावर शिवसैनिकांना विचारांचं सोनं दिलंय. हे सोनं लुटायला मिळेल असं वाटलं होतं. पण नळावरची भांडणं व उणीदुणी बघायला मिळाली. तिरस्कार, द्वेष, कुरघोडी तसेच एकमेकांना शिव्या घालण्यासाठी मेळाव्याचा उपयोग उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) करुन घेतला. पालिका निवडणुका तोंडावर काही नवीन घोषणा ऐकायला मिळेल असं वाटत होते, पण नवीन कुठलेच मुद्दे नव्हते. दरम्यान, चांगले रस्ते, खड्ड्यांची समस्या, पाणी तुंबण्याची समस्या यावर उद्धव ठाकरे बोललेच नाहीत. फक्त गद्दार, खंजीर, खोके याव्यतिरिक्त दसरा मेळाव्यात काहीच नव्हतं, असा घणाघी टिका मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी कालच्या दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरेंवर केली आहे.
खंजीर खुपसायची सवय जुनीच
यावेळी पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी जुना किस्सा सांगितला. २०१७ साली मुंबई पालिका निवडणुकीत मला व संतोष धुरीला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवले होते. आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे, असं सांगून आमच्याशी बोलणी केली. पण त्यानंतर त्यानंतर आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलंय. त्यामुळे खंजीर खुपसायची सवय त्यांची जुनीच आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.