Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News: राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रातोरात कुणी बदलले? सांगतील राजकारण पेटणार

जयंत पाटील यांची कोंडी करण्याची प्रयत्न सुरू असल्याची चर्चाही जिल्ह्यात सुरू झाली आहे. या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारण आता अधिकच तापणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 24, 2025 | 10:38 AM
Sangali News:

Sangali News:

Follow Us
Close
Follow Us:
  • राजारामबापू पाटील सहकारी साखर कारख्यान्याचे नाव रातोरात बदलण्याचा प्रकार
  • कारखान्याच्या कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक
  • जयंत पाटील- गोपीचंद पडळकरांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता

Sangali News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारख्यान्याचे नाव रातोरात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जयंत पाटील यांच्या कारखान्याचे नाव राजारामबापू सहकारी साखर कारखाना असे होते. पण काल रात्री कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Maharashtra Rain Alert: आज बाहेर पडूच नका! पुणे-मुंबईसह २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

महापुरुषांचे चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर असलेला डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना उद्देशून, “राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही” असा इशारा दिला होता. त्यामुळे या घटनेमागे राजकीय हेतू असल्याची चर्चा सध्या जत तालुक्यात रंगली आहे. पण काल रात्रीच्या या प्रकारानंतर पाटील आणि पडळकर यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याशिवाय जयंत पाटील यांची कोंडी करण्याची प्रयत्न सुरू असल्याची चर्चाही जिल्ह्यात सुरू झाली आहे. या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारण आता अधिकच तापणार आहे. तसेच, सांगलीत जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचे हे कृत्य असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

शेतकऱ्याची अनोखी ‘दिवाळी भेट’, मुलीला स्कुटी खरेदी करून देण्यासाठी 40 हजार रुपयांच्या नाण्यांसह पोहचला दुकानात

कोण होते राजे विजयसिंह डफळे?

राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानाचे शेवटचे राजे होते. १९२८-१९४८ या कालावधीत त्यांच्या नावाने अनेक सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना विशेष महत्त्वाचा मानला जातो. हा कारखाना जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीने आणि सहभागाने उभा करण्यात आला होता. या कारखान्यांमुळे स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार आणि आर्थिक स्थैर्यही मिळाले.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?

तुम्हाला जतची इतकी काळजी असेल तर जतचा साखर कारखाना सभासदांना देऊन टाका. नाहीतर मी राजारामापू पाटील सहकारी साखर कारखानान युनीट चारचे धुराडे पेटू देणार नाही. त्यासाठी मोठा संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. वेळ पडली तर कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करण्याची तयारी आहे, हा कारखाना सभासदांना परत केल्याशिवाय तो सुरू होऊ देणार नाही, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला होता.

 

Web Title: Sangali news who changed the name of rajarambapu patil sugar factory overnight they will say that politics will flare up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • gopichand padalkar
  • Jayant Patil News
  • Sangali Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.