पुणे-मुंबईसह २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
राज्यातून मान्सून माघारी गेल्यानंतरही पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईसह राज्यातील २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Share Market Today: धडाधड होणार नफा! आज मार्केट ओपनिंग होणार पॉझिटिव्ह, ‘या’ शेअर्सवर पडणार पैशांचा
हवामान विभागाच्या मते, राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासोबतच हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.
मान्सूनने परतीची वाढ धरल्यानंतर राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ वाढला असून तापमानही चांगलेच वाढले आहे. पण त्याचवेळी गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट झाल्याने पहाटेच्या वेळी गारवा वाढत चालला आहे. कोकणासह मुंबईत काल पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे उन्हाच्या तीव्रतेत थोडीशी घट जाणवली.
Numerology: या मूलांकांच्या लोकांना घ्यावी लागेल खूप मेहनत, होईल आर्थिक लाभ
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस हवामानातील बदल महत्त्वाचे ठरतील, अशी माहिती दिली आहे. पावसाची ही उघडीप सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाच्या ऐन दिवाळीच्या काळातही पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांच्या उत्साहावर काहीसा विरजण पडले आहे, तरीही तापमानातील घसरण आणि गारव्यातून काहीसा दिलासा मिळाल्याचे वातावरण दिसून येत आहे.






