Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Highway : ‘मोजणील अधिकारी आला तर झाडाला बांधू’, ‘शक्तीपीठ’विरोधात सांगलीत एल्गार

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार विरोध सुरू आहे. याला सांगलीतील शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी कृती समितीने जोरदार विरोध केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 21, 2025 | 10:43 PM
'मोजणील अधिकारी आला तर झाडाला बांधू', 'शक्तीपीठ'विरोधात सांगलीत एल्गार

'मोजणील अधिकारी आला तर झाडाला बांधू', 'शक्तीपीठ'विरोधात सांगलीत एल्गार

Follow Us
Close
Follow Us:

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार विरोध सुरू आहे. थोड्या प्रमाणात शक्तीपाठाच्या मुद्द्याने भाजपला झळ पोहचली होती. तशीच झळ विधानसभेला बसू नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना रद्द केली होती. मात्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या चाव्या हातात घेताच शक्तिपीठ महामार्गाची नव्याने अधिसूचना काढली. राज्य सरकारने महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानंतर आता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपदनाची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. तसेच भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यास सांगताना गरज पडल्यास पोलिस बंदोबस्त घ्या अशा सूचना केल्या आहेत. यानंतर आता सांगलीत शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न पेडण्याची शक्यता असून शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी कृती समितीने जोरदार विरोध केला आहे. तसेच जर अधिकारी आले तर त्यांना झाडाला बांधू असाही इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन दोन महिन्यात पूर्ण करून अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यानंतर प्रशासनानेही प्रांताधिकाऱ्यांना तातडीने मोजणीची प्रक्रिया सुरू करावी असे आदेश दिले आहेत. तर जे शेतकरी अडथळा आणतील तेथे पोलिस बंदोबस्त घ्या असेही म्हटले आहे. यावरून आता शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी प्रशासनाला गर्भीत इशारा दिला आहे.

कांबळे यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आदेश मानत प्रांताधिकारी यांना शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन आणि मोजणीचे आदेश दिले आहेत. तसेच याचा अहवाल पुढील दोन महिन्यात सादर करण्यास सांगितले आहे. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुका निरीक्षक भूमी अभिलेखासाठी लागणारे शुल्क निश्चित करून संबंधीतांकडे भरावे, असे आदेश दिले आहेत. तर जेथे मोजणीसाठी अडचणी निर्माण होतील तेथे पोलिस संरक्षण घ्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

पण या महामार्गाला आमच्या शेतकऱ्यांचा विरोध असून सरकार दडपशाही पध्दतीने शेतकऱ्यांच्या माथ्यावर तो मारत आहे. यामुळे आता शेतकरी ही जशास तसे उत्तर देणार आहे. जर मोजणीला शेतात अधिकारी, कर्मचारी आले तर त्यांना झाडाला बांधून ठेवण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही आमची जमिनी देणार नाही. शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतीवर सुनावणी न घेताच सरकार कायदा हातात घेत आहे. जर शासन असे शेतकऱ्यांबरोबर वागणार असेल तर आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल, असे संकेतही दिगंबर कांबळे यांनी दिले आहेत.

शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार असून तो खानापूर तालुक्यात बाणूरगड येथे प्रवेश करणार आहे. तर जिल्ह्यातील 12 गावामधून जाणार आहे. यात खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि मतकुणकी गावाचा समावेश होतो. तर मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, बिसूर, कर्नाळ, पद्माळे ही गावेही येतात. यानंतर हा महामार्ग सांगलीवाडीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव येथे प्रवेश करेल. पण आता कोल्हापूर जिल्ह्यातही महामार्गाला विरोध वाढला असून मंत्री मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्यातून जाणार नाही असे म्हटले आहे.

Web Title: Sangli digambar kamble warn officials on nagpur goa shaktipith highway survey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 10:43 PM

Topics:  

  • Shaktipeeth Expressway
  • Shaktipeeth Highway
  • Shaktipeeth Highway News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.