राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार विरोध सुरू आहे. याला सांगलीतील शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी कृती समितीने जोरदार विरोध केला आहे.
राज्य सरकारचा आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ मार्ग. गोवा ते नागपूर असा हा मार्ग आहे. सांगली आणि कोल्हापूरमधील शेतकरी आणि स्थानिकांनी या मार्गाला तीव्र विरोध केला होता.
पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गचा प्रश्न उपस्थित केला. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं आहे.