मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या मंत्रीमंडळासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले यावरुन राजकीय वर्तुळातुन विविध प्रतिक्रिया उमटत आहे. अयोध्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावल्यानंतर आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनीही शिंदे गटावर टिका केली आहे.
[read_also content=”शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की अयोध्येला?महत्त्व कशाला? अयोध्या दौऱ्यावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला https://www.navarashtra.com/india/sharad-pawar-criticized-to-chief-minister-eknath-shinde-visit-to-ayodhya-tour-nrps-382356.html”]
एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावरुन संजय राऊतांनी त्यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्याची आठवण सांगितली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना आम्हीच अयोध्येला घेऊन गेलो होते. सत्यवचनी प्रभू श्रीरामच्या दर्शनाला अयोध्येत जाणे हा एक आनंद असतो. पण, रामाचे सत्यवचन तुम्ही कोठून घेणार आहात? जेव्हा पक्ष सोडला, बेईमानी केली सुरत आणि गुवाहाटीला दर्शनासाठी गेला. तेव्हा रामाची आठवण झाली नाही, अशी जहरी टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.
[read_also content=”‘बळीराजावरचं संकट दूर होऊ दे’ शिंदे फडणवीसांची रामलल्लाला आर्त हाक!अयोध्येला दिली भेट Navarashtra News Network Navarashtra News Network नवराष्ट्र.कॉम https://www.navarashtra.com/latest-news/cm-eknath-shinde-devendra-fadnavis-pray-to-ramlalla-in-ayoshya-nrps-382401.html”]
राज्यात गेल्या काही दिवसापासुन वातावरणात अचानक बदल पाहायला मिळत आहे. या वातावरण बदलाचा फटका राज्याला बसला असुन “महाराष्ट्रात गेल्या ७२ तासांत अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथेही शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं आहे. असे असताना शेतकऱ्यांना मदत करायच सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघाले आहे. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद यांना मिळणार नाही,” असे टी संजय राऊत म्हणाले.