मुंबई : कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरून सध्या दोन्ही राज्याच राजकारण चांगलच पेटलं आहे. यावरु संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. ज्यांना आपल्या महाराष्ट्रातील जनतेची काळजी नाही. महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही, सीमा कुरतडल्या जातायत या राज्यांच्या. ज्या 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करुन, बलिदान करुन हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली आहे. कोणी याबाजुला कुरतडतंय, कुणी त्या बाजुनं कुरतडतंय. आणि हे सरकार षंडासारखं, नामर्दासारखं बसलेलं आहे. हो नामर्दच सरकार आहे.”, असं संजय राऊत म्हणाले.
[read_also content=”सीमाप्रश्नी एकनाथ झाले मूकनाथ! कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादावरुन भाजपवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-being-criticized-over-maharashtra-karnataka-border-controversy-nrps-351626.html”]
काल बेळगावमध्ये बेळगावमधील (Belgaon) हिरेबागवाडी येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या (Kannada Rakshan Vedike) कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यावरुन कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न आणखी चिघळल्याचं पाहायला मिळालं. यानतंर याबाबत खासदार संजय राऊतांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, सरकारला महाराष्ट्राच्या सीमांचं संरक्षण करता येत नाही. त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत असही म्हण्टलयं.
एकनाथ शिंदेंनी बसवराज बोम्मईंशी केली चर्चा
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ट्विटमध्ये बोम्मई म्हणतात की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी फोनवरून चर्चा केली आहे, दोन्ही राज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे यावर आम्ही दोघांचेही एकमत झाले आहे. दोन्ही राज्यातील लोकांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र, कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात सुरू राहील, असेही बोम्मई यांनी म्हटले आहे.