mp sanjay raut target mahayuti government over delhi visit political news
Mumbai Politics: ” मनसेने मोर्च्यासाठी परवानगी मागितली होती. त्याबाबत चर्चा करून परवानगी नाकारली जाते. अचानक पोलिस बळाचा वापर करून नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली जाते. हे नक्की महाराष्ट्र राज्य आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात माजी दिवंगत मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचा आत्मा आला आहे. त्यानुसार ते अशी अघोरी कामे करत आहे. मला तर वाटतयं एक दिवस मोरारजी भाईंप्रमाणे गोळ्या चालवून जे १०६ हुतात्मे झाले त्यांचाही विक्रम मोडतील असं वर्तन फडणवीस करत आहेत.”अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मराठी भाषेच्या आणि स्थानिकांच्या हक्कांच्या मुद्द्यावर मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मीरा रोड येथे नियोजित करण्यात आलेल्या मराठी अस्मिता मोर्चासाठी मनसेने मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना एकत्र आले होते. मात्र, पोलिसांनी मोर्च्याला परवानगी नाकारली असून, सकाळपासूनच अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
वसई-विरार परिसरात पहाटेपासूनच पोलिसांनी छापे टाकत मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या मोर्चामार्फत स्थानिक मराठी नागरिकांच्या रोजगाराच्या संधी, भाषा सन्मान, तसेच अनधिकृत स्थलांतराबाबत भूमिका मांडण्यात येणार होती. मनसे नेते म्हणाले की, “मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही झगडत राहणार. पोलिसांनी आमच्या लोकशाही हक्कांवर गदा आणली आहे.” तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व ठाणे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र मनसे-शिवसेनेच्या मोर्च्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परवानगी का नाकारली, मराठी माणसांनी मोर्चा कुठे काढायचा. फडणवीसांनी कुणाच्या दबावाखाली मनसेचा मोर्च्या नाकारला हे आज विधानसभेत जाहीरपणे सांगावे. मनसेचे कार्यकर्ते , देशपांडे जाधव, आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांतरही त्यांना अटक करण्यात आली आहे, तुमच्यावर कोणत्या दुबेचा दबाव आहे. हे आम्हालाही सांगा. महाराष्ट्रात मराठी माणूसत्याचा हक्कासाठी आवाज उठवू शकत नाही. तुमही बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेता. बाळासाहेबांनी न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती. तुम्ही आम्हाला सांगता आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले. तुम्ही काय करताय तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्याना हुतात्मा चौकात आणलं पाहिजे
महाराष्ट्राविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दांत वक्तव्य केलं, तो भाजपचा नेता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा खास माणूस आहे हा निशिकांत दुबे. महाराष्ट्रात आम्ही कोणत्याही हिंदी भाषिकावर हल्ला केला नाही. हे फडणवीसांनी सांगितलं पाहिजे,’असंही त्यांनी म्हटलं आहे.
पंढरपूर हादरलं ! पत्नीने मुलांसह आत्महत्या केल्याचे समजताच पतीनेही घेतला गळफास; परिसरात एकच खळबळ
तसेच, “कोणत्याही हिंदी भाषिकाबाबत अपशब्द वापरला नाही. काय माहित आहे निशिकांत दुबेला म्हणतो पटकून पटकून मारू हे उद्योगपतींची दलाली करून कमिशन खोरी करण्या इतपत सोप आहे का मिस्टर दुबे, हे मोदी शाहांचे बुट चाटण्या इतकं सोप नाही. फेक डिग्री घेऊन हा माणूस संसंदेत बसला आहेत. म्हणजे जसा गुरू तसा चेला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तोंडात बोळा घालून बसला आहे.
हा महाराष्ट्र स्वावलंबी आहे. महाराष्ट्र देशाचे पोट भरतो. सर्व प्रांतचे लोक महाराष्ट्रात राहतात. त्यांना आम्ही कधी त्यांची जात-पात प्रांत धर्म विचारला नाही. कोरोनात तुमच्या गंगेत प्रेत तरंगत होते, त्यावेळी महाराष्ट्र देशाचे पोट भरत होता, त्यांचे उपचार करत होता. त्या दुबेला सांगा महाराष्ट्राच्या नादी लागू नको, नाहीतर आम्हालाही दाखवावं लागेल. डुप्लिकेट शिवसेनेवाले आता गप्प का, मोदींमध्ये हिंमत असेल तर पहलगामचे दहशतवादी पकडावे.” अशी टीकाही त्यांनी केली आहे.