
Sanjay Raut News:
पुण्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले
दरम्यान आज बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतम अदानी आणि पवार कुटुब एकाच मंचावर दिसून येणार आहे. काँग्रेसकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानींवर टीका केली जाते. त्यातच आता गौतम अदानी आणि पवार कुटुंब एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.
“शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात राजकीय संबंध नाहीत . ते कौटुंबिक आणि व्यक्तीगत आहेत. त्यामुळे आपल्या कार्यक्रममात कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी गौतम अदाणींना बोलावलं असेल, त्या कार्यक्रमाला ज्यांनी संपूर्ण पवार कुटुंब आणि पक्ष फोडला ते अजित पवार देखील उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण शरद पवार यांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.
पुण्यात महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; कोण किती जागा लढणार?
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. या युतीमुळे दोन्ही पक्षांची ताकद दुणावली असून आत्मविश्वासातही वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही ११७ ते १२० जागा जिंकू, असा ठाम विश्वास शिवसेना (ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आमच्या आघाडीत सहभागी व्हावेत, ही सर्वांचीच इच्छा आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी प्रयत्न करून मुंबईसाठी एक चांगला निवडणूक फॉर्म्युला तयार केला आहे. राष्ट्रवादीला ज्या जागांची अपेक्षा होती, त्या जागा त्यांना देण्यात आल्या आहेत.
युतीसाठी काही जागांवर आम्ही त्याग केला असला तरी मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा विजय हेच आमचे व्यापक उद्दिष्ट आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. मनसे आणि राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या जागा या विद्यमान जागा असल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, सत्ता आल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.