eknath shinde and sanjay raut
नाशिक: राज्यातलं राजकारण परिवर्तनाच्या दिशेनं सुरु आहे. 2024 साली परिवर्तन घडलेच मात्र त्याआधीही परिवर्तन होऊ शकेल, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केलाय. जर न्याय व्यवस्थेवर दबाव आला नाही तर घटना आणि कायदा यांचं उल्लंघन करणारं बेकायदेशीर शिंदे सरकार (Shinde Government) फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असंही ते म्हणाले. घटनेनुसार न्याय झाल्यास 16 आमदार अपात्र ठरतील. त्यामुळं सध्या राज्यात वेळकाढू धोरण सुरु असल्याची टीकाही त्यांनी केलीय. सरकार व्हेंटिलेटवर आहे, ते सुप्रीम कोर्टानं काढलं तर हे राम होईल. कुणीच त्यांच्याबरोबर राहणार नाही, असंही राऊत म्हणाले. हे सरकार कधी उलथवायचं आणि निवडणुकांना कधी सामोरं जायचं या प्रतीक्षेत जनता असल्याचंही राऊत म्हणाले आहेत.
[read_also content=”उद्धवजी तुमचं कर्तृत्व काय ? बाळासाहेबांचे चिरंजीव आहात म्हणून मिळाली गादी, रामदास कदम यांचा थेट आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/ramdas-kadam-said-that-uddhav-thackeray-finished-the-shivsena-nrsr-359867.html”]
शिवसेना एकच आहे- राऊत
जे गट-तट चाललंय ते तात्पुरतं आहे, शिवसेना एकच आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, असं संजय राऊत म्हणालेत. ज्या शिवसेनेची (Shivsena) स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करतायेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आहे. शिवसेनेच्या वटवृक्षाखालचा कचरा काही जण उचलून नेतायेत, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावलाय. त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषणं करतायेत, असंही ते म्हणाले. नाशिकमध्ये डॅमेज झालेलं नाही त्यामुळं डॅमेज कंट्रोलची परिस्थिती नाही, असंही राऊत म्हणाले.
शिंदे सरकारमध्ये दोन गट- राऊत
शिंदे सरकारमध्ये दोन गट पडलेत. तुमचं तुम्ही बघा आणि आमचं आम्ही बघू असे ते गट आहेत. तुमचं तुम्ही बघा म्हणणारे 40 जणांचा खूश करण्यात मग्न आहेत. राज्य सरकार अस्तित्वातच नाहीये असंही ते म्हणाले. रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण येतंय. मुख्यमंत्र्यांची दोन प्रकरणं आली. अब्दुल सत्तार यांच्याबाबत दोन प्रकरण, उदय सामंत बोगस डिर्ग्रीची आली. सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं होतं. विरोधी पक्ष गुन्हेगार असल्यासारखी वागणूक होती. मुख्यमंत्र्यांसह 6 मंत्र्यांवर आरोप होऊनही सरकार ठोब्यासारखं बसून राहिलं अशी टीका राऊत यांनी केलीय.