Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari : हरि नामाच्या जयघोषाने पुरंदावडे दुमदुमले; माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पार

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली आहे. पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे पार पडले आहे. लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 01, 2025 | 05:40 PM
Sant Dnyaneshwar Maharaj palkhi ringan sohala at Purandawade akluj Solapur news

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi ringan sohala at Purandawade akluj Solapur news

Follow Us
Close
Follow Us:

अकलूज  : कृष्णा लावंड :  स्वर्ग सुखाची अनुभूती देणारा वैष्णवांच्या दाटीत अश्वांच्या तीन नेत्रदीपक फेऱ्यांनी दौडीला प्रारंभ झाला. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात माऊली माऊली नामाचा उद्घोष सुरू होता. लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा  आणि वारीच्या वाटचालीत नवचैतन्य निर्माण करणारा हा पहिला गोल रिंगणाचा सोहळा  मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पुरंदावडे येथे पार पडला. दुपारचे जेवण करून सायंकाळी माळशिरस ठिकाणी मुक्कामी विसावला.

यावेळी पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या रिंगण सोहळ्याने भाविकांचे डोळ्यांचे पारणे फेडले. नातेपुते येथील मुक्कामानंतर माऊलींच्या पालखीचे पहिल्या गोलरिंगणसाठी पुरंदावडे येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जयघोषात आगमन झाले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच रिंगणात भाविकांनी गर्दी केली होती. गोल रिंगणासाठी दुपारी अश्व पुरंदावडे येथील रिंगणात दाखल झाला. त्याचबरोबर रथा पुढील दिंड्याही दाखल झाल्या. या दिंडीमध्ये पुरुष व महिला वारकरी सहभागी झाले होते. भजनाच्या तालावर ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करीत या दिंडीने उपस्थित लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

दुपारी 12.35 मिनिटांनी माउलींचा रथ सोहळा पुरुंदावडे येथील रिंगण ठिकाणी पोहोचला. पालखीने एक फेरी मारली व पालखी मध्या ठिकाणी ठेवण्यात आली. पालखीची पूजा अर्जुनसिंह मोहिते पाटील, सरपंच राणी मोहीते, ,उपसंरपंच देविदास ढोपे यांच्या हस्ते करण्यात आली.चोपदार बाळासाहेब यानी रिंगण लावून घेतले. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन धारक महिला झेंडेकरी गोल रिंगण झाले. झेंडेकर यांनी पहिल्यांदा गोल मारून अश्वांना गोल रिंगण दाखवले. पुणे येथील राजश्री जुन्नरकर यांनी आकर्षक अशी रांगोळी रिंगण भोवती काढल्यामुळे ही रांगोळी मने आकर्षित करीत होती.

दुपारी 01:22 वाजता रिंगणासाठी अश्व सोडण्यात आले आणि माऊली माऊली असा जयघोष करीत तीन फेऱ्या पूर्ण केली. दोन्ही अश्वांनी रथासमोर सत्तावीस दिंडी व रथामागील वीस दिंड्या समोर नेत्रदीपक दौड घेत दिव्य सोहळा पार पडला. यावेळी विठुनामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना आबालवृद्धांचे भान हरपले होते . वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. गोल रिंगण सुरू असतानाच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानबा तुकारामाचा एकच जयघोष केला. या जयघोषाने अवघे पुरंदावडे आसमंत दुमदुमले.

भक्तीमय अन् चैतन्यमय वातावरण

अश्व पुढे जात असताना त्यांच्या चरणी असणारी रस भाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली . त्यानंतर महिला पुरुषांनी फुगडय़ांचे फेर धरले. कोणी टाळ मृदुंगांच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला. विठ्ठलाच्या दारी कोणी लहान थोर नाही या भावनेने प्रत्येक जण एकमेकांचे पाया पडत होते

रिंगणाचे अश्व विसावताच वारकरी मैदानात उतरले दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गड्यास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. चोपदारांच्या निमंत्रणानंतर उडीच्या कार्यक्रमासाठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या. टाळ, मृदुंगाच्या साथीने ” ज्ञानोबा माऊली तुकाराम ” अशा गजरात आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म सुरू झाला. वृद्व, महिला आणि अवघी तरुणाई तल्लीन होऊन नाचत होती. एकात्म भक्तीभावाचा हा शाश्‍वत सुखाचा सोहळा भाविकांनी अनुभवला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सकाळपासूनच कधी उन्ह तर कधी ढगाळ तर कधी लहान पावसाच्या सरीच्या वातावरण निर्माण झाले होते. गोल रिंगण सोहळासाठी वारकरांचा वाटचालीचालीत नवचैतन्य निर्माण झाले होते. यामुळे वैष्णवांची पाऊले पंढरीच्या दिशेने झपझप पङत होती. रिंगण सोहळा पाहण्यासाठी पुरंदावडे शेजारील सर्व गावांची त्या ठिकाणी ग्रामस्थ गोळा झाले होते. नातेपुते ते पुरंदावडे या वाटचालीत विविध ग्रामपंचायती सरपंच पदाधिकारी व भाविकांनी माउलींसह सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले. हा दुपारचा गोल रिंगण सोहळा संपवून पुरंदावडे या ठिकाणी जेवण  करून सायंकाळी माळशिरस येथे माऊलींचा सोहळा विसवला.

 

Web Title: Sant dnyaneshwar maharaj palkhi ringan sohala at purandawade akluj solapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 05:38 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Palkhi Sohala
  • Sant Dnyaneshwar Maharaj

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.