Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश

Ajinkyatara Fort Development Satara: सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराबाईंच्या समाधीस्थळ विकासासाठी २६७ कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 27, 2026 | 04:22 PM
अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर

अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर

Follow Us
Follow Us:
  • अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर
  • छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश
  • वाचा संपूर्ण बातमी!
सातारा, दि. 28: ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन, संवर्धन व परिसर सुशोभीकरणासाठी 134.80 कोटी आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे संवर्धन, जीर्णोद्धार तसेच परिसर विकसित करण्याच्या रक्कम रुपये 132.95 कोटींच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही दोन्ही कामे वेगाने करण्यासोबतच सर्व कामे दर्जेदार करा, दर्जाबाबत कसलीही तडजोड करू नका, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठक घेऊन अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन व संवर्धन, परिसर सुशोभीकरण आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई,महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि परिसर विकसित करण्याचा कामाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, अक्षय जाधव, फिरोज पठाण, सचिन कांबळे, कन्हैयालाल राजपुरोहित, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विश्वास सातपुते, पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, श्रीराम कुलकर्णी, इंद्रजित नागेशकर (दूरदृष्यं प्रणालीद्वारे) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान

अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन-संवर्धन आणि संगम माहुली येथील विकासकामांच्या बांधकाम कामांची निविदा एकत्रित काढावी, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्या. अजिंक्यतारा किल्ला संवर्धन कामात विविध ठिकाणी पायवाटा तयार करण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी किल्ल्यावर वन्य प्राण्यांचा वावर असतो, त्यामुळे प्रकाश केवळ पायवाटांवर पडेल अशा स्वरूपाचे दिवे बसवावेत. संवर्धनाच्या कामातून निधी शिल्लक राहिल्यास खिंडीतील गणपती मंदिरापासून अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट तयार करावी. या कामांच्या संदर्भाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अजिंक्यतारा किल्ल्याची पाहणी करावी, अशी सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

संगम माहुली येथील कामाचा आढावा घेताना ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, संगम माहुलीच्या प्रवेशद्वारापासून गावापर्यंतचा रस्ता काँक्रीटचा करावा व रस्त्याची रुंदी वाढवावी. यासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चर्चा करावी. तसेच संगम माहुली येथे पार्किंग व्यवस्थेसह गावातील सर्व गटारे बंदिस्त करावीत. प्रवेशद्वारावरील कमान आकर्षक नवीन डिझाइननुसार नव्याने उभी करावी.

अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील कामे करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नका. ही दोन्ही कामे सातारा शहरातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील अशा पद्धतीने उत्कृष्ट दर्जाची करावीत, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड

Web Title: Satara ajinkyatara fort and sangam mahuli development fund sanctioned marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Shivendrasinhraje Bhosale

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
2

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
3

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
4

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.