
Supriya Sule, NCP, BJP, Pune News, MLC Election,
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्स अकाऊंटवर पोस्ट करून याबाबत आरोप केले आहेत. “पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मतदानानंतर तो दाखविल्यावर ठरलेले पैसे द्यायचे, असा प्रकार सुरू असल्याचे मतदार सांगत आहेत.
या तक्रारी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहेत. मतदानाची गोपनीयता आणि मतदारांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराची निवडणूक आयोगाने व शासनाने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नयेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडलीच पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा मतदान करतानाचा हा व्हिडिओ पहा. मतदान केंद्रावर पक्षीय ओळख बाजूला ठेवून एक सामान्य मतदार म्हणून जाणे अपेक्षित असते. लोकशाहीच्या या पवित्र प्रक्रियेचे पावित्र्य आणि मतदान केंद्राची निष्पक्षता प्रत्येकाने जपली पाहिजे.
India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा
उमेदवाराला पक्षाचे चिन्ह गळ्यात परिधान करुन मतदान केंद्रावर प्रवेश कसा दिला? ही सवलत केवळ सत्ताधारी उमेदवारालाच का दिली जाते? हा आदर्श आचारसंहितेचा भंग नाही का? तुम्ही सदर उमेदवारांवर नेमकी कोणती कारवाई करणार आहात याचे उत्तर महाराष्ट्र शासन, निवडणूक आयोगाने दिले पाहिजे.
Ans: त्यांनी असा आरोप केला आहे की, पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघात भाजपकडून मतदारांना 'स्पायकॅम' असलेले पेन देऊन, भाजपलाच मतदान केल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवल्यानंतर पैसे दिले जात आहेत.
Ans: पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या मतदान केंद्रातील व्हिडिओवर त्यांनी आक्षेप घेत, मतदान केंद्राच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Ans: मतदानाची गोपनीयता आणि पारदर्शकता जपण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासनाने या तक्रारींची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.