Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलाने स्वतःच रचला अपहरणाचा बनाव; पोलिसांच्या तत्परतेने बनाव उघड

Karad Fake kidnapping case: कचरेवाडी (ता. कराड) येथील १६ वर्षीय मुलाने भीतीपोटी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे सातारा पोलिसांच्या तपासातून उघड झाले. घरातून ४६ हजार रुपये घेऊन निघून गेलेल्या या मुलाला तांत्रिक तपासाच्या मदतीने पुण्यातील येरवडा परिसरातून सुखरूप शोधून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 06, 2026 | 09:15 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलाने स्वतःच रचला अपहरणाचा बनाव
  • पोलिसांच्या तत्परतेने बनाव उघड
  • येरवडा परिसरातून मुलाला सुखरूप शोधले
मसूर : कचरेवाडी ता. कराड, येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने स्वतःच्या अपहरणाचा रचलेला बनाव सातारा जिल्हा पोलीस दलाच्या तत्परतेमुळे व तांत्रिक तपासाच्या आधारे उघडकीस आला आहे. भीतीपोटी ४६,०००/- रोख रक्कम घरून पैसे घेऊन पळून गेलेल्या या मुलास पुण्यातील येरवडा परिसरातून सुखरूप शोधून काढत त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बुधवारी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास कचरेवाडीचा अल्पवयीन मुलगा कोणास काहीही न सांगता चप्पल खरेदी करण्यासाठी मसूरला गेला होता. सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास त्याने तारळे (ता. पाटण) येथील आपल्या आत्याला फोन करून “मला जबरदस्तीने गाडीतून तोंड बांधून डोंगरात आणून सोडले आहे. असे सांगून फोन बंद केला. घाबरलेल्या नातेवाईकांनी तात्काळ मसूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवली.

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार मसूर पोलीस ठाण्याच्या पथकाने स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. सदर मुलगा मसूर एसटी स्टँडसमोरील दुकानातून पाठीवरची बॅग खरेदी करून वडापने उंब्रजकडे गेल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान मुलाने घरातून कोणास न सांगता ₹४६,०००/- रोख रक्कम सोबत नेल्याचे उघडकीस आले. सातारा सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केले असता, अपहरणाची माहिती खोटी असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. नातेवाईकांनाही तपासाची माहिती दिल्यानंतर त्यांचाही अपहरणाच्या बनावावर विश्वास बसला.

तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ पुण्याकडे रवाना झाले. पुण्यातील येरवडा, लक्ष्मीनगर परिसरातून या अल्पवयीन मुलाला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, भीतीपोटी आपण अपहरणाचा हा बनाव रचल्याचे मुलाने कबूल केले. आवश्यक त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुलास सुरक्षितपणे त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूसकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. गोडके, स.पो.नि. अभिजित यादव व पथकातील. सायबर पोलीस ठाणे, सातारा: स.पो.नि. राजेश माळी, मसूर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. आदिनाथ खरात, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भोसले, लावंड, सूर्यकांत पवार, अशोक पाटील, महेश घाटुकडे. यांनी तपासकामी प्रयत्न केले.

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज

Web Title: Satara karad minor boy fake kidnapping case police action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Karad
  • kidnapping
  • Kidnapping news

संबंधित बातम्या

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील
1

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.