Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara municipal election: साताऱ्यात २३३ जागांसाठी मतदान पूर्ण; पण मतमोजणी पुढे ढकलल्याने वाढला सस्पेन्स

सातारा जिल्ह्यात फलटण, महाबळेश्वर, कराडमधील प्रभाग क्रमांक एक व मलकापूर नगरपरिषदेच्या दोन जागेवरील निवडणुकीला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 03, 2025 | 09:29 AM
Satara municipal election

Satara municipal election

Follow Us
Close
Follow Us:
  •  २३३ जागांसाठी ६०९ उमेदवार यांचे भवितव्य मतपेटीत बंद
  • पहिल्या दोन तासांमध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी १२ टक्के मतदानाची नोंद
  • कराडमध्ये सुद्धा काही ठिकाणी दोन गटांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी
Satara Voting News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पालिका निवडणुकीमध्ये मंगळवारी जिल्ह्यातील २३३ जागांसाठी ६०९ उमेदवार यांचे भवितव्य मशीन बंद झाले. दरम्यान ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने रद्द करून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे जिल्ह्याचा राजकीय सस्पेन्स पुन्हा ताणला गेला आहे.

‘नगराध्यक्षपदासाठी मी फॉर्म भरू शकलो नाही याची नाराजी’; उदयनराजेंची मिश्किल टोलेबाजी

सातारा जिल्ह्यात फलटण, महाबळेश्वर, कराडमधील प्रभाग क्रमांक एक व मलकापूर नगरपरिषदेच्या दोन जागेवरील निवडणुकीला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ३७४ मतदान केंद्रांवर मंगळवारी दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसातपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दोन तासांमध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी १२ टक्के मतदानाची नोंद झाली. वातावरणात गारवा होता तरीसुद्धा नागरिकांच्या जिल्ह्यात मतदानासाठी उत्साहाने रांगा दिसून आल्या. तब्बल नऊ वर्षांनी नगरपालिका निवडणूक होत असल्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये प्रचंड उत्साह होता.

जिल्ह्यात २३५४ कर्मचारी व ५४ अधिकारी नेमण्यात आले होते. ३७४ मतदान केंद्रांवर सुमारे साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तीन लाख २८ हजार ४३५ मतदारांपैकी महिला मतदारएक लाख ६५ हजार १२, तर पुरुष मतदार एक लाख ६३ हजार ३७१ इतके आहेत. दुपारी बारापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद मेढा येथे ५६ टक्के इतकी नोंदवण्यात आली. दीड वाजता प्रशासनाने आढावा घेतला असता पाचगणी येथे २७.३१, सातारा येथे ३१.४३, मलकापूर येथे ३९.१०, म्हसवड येथे ३९.५८, वाई येथे ३६.३४, कराड येथे ३४.८८, रहिमतपूर येथे ४८.५८ तर मेढा येथे ५९.२६ इतके मतदान झाले होते. पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला.

बिहारनंतर पश्चिम बंगालसह ‘या’ राज्यांत होणार निवडणुका; अमित शहांकडे येणार मोठी जबाबदारी

कराडमध्ये कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी

कराडमध्ये सुद्धा काही ठिकाणी दोन गटांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी झाल्याच्या घटना घडल्या पाचगणी, महाबळेश्वर, रहिमतपूर, म्हसवड, वाई, मलकापूर येथे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा उत्साह दिसून आला, मेढा, मलकापूर, कराड येथे उत्साहात ६० टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले. त्यामुळे येथील कार्यकत्यांची राजकीय धाकधूक वाढली आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी ६२.१४ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. आकडेवारीच्या सुसूत्रीकरणाच्या अभावामुळे जिल्हा प्रशासनाने या माहितीला दुजोरा दिला नाही.

मतदार यादीत नावे न सापडल्याने उडाला गोंधळ

प्रभाग क्रमांक तीन मध्ये सुद्धा रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझार यांनी दोन अपक्ष उमेदवार उभे केले आहेत. तेथेही मतदार यादीत संबंधित मतदाराची नावे न सापडल्याने त्यानी आक्षेप घेतला. त्यामुळे सुद्धा तेथे मोठा गोंधळ उडाला.

 

Web Title: Satara municipal polls conclude for 233 seats counting rescheduled to december 21 amid political suspense

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • Municipal Elections
  • Satara

संबंधित बातम्या

Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले
1

Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले

Karad Bus Accident: सहलीसाठी गेलेल्या बसचा कराडजवळ भीषण अपघात; २० फूट खड्ड्यात कोसळली, ४५ जण जखमी
2

Karad Bus Accident: सहलीसाठी गेलेल्या बसचा कराडजवळ भीषण अपघात; २० फूट खड्ड्यात कोसळली, ४५ जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.