Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : रस्ते कामातील दिरंगाईवर वाईत नागरिकांचा संताप; नगरपरिषद सभेत प्रशासनाला जाब

वाई–महाबळेश्वर रस्ता आणि वाई एमआयडीसी मार्गाचे नूतनीकरण गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने शहराची वाहतूक व्यवस्था आणि व्यापार पूर्णपणे कोलमडला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 09, 2026 | 07:27 PM
Satara News : रस्ते कामातील दिरंगाईवर वाईत नागरिकांचा संताप; नगरपरिषद सभेत प्रशासनाला जाब
Follow Us
Follow Us:
  • काम दोन वर्षांपासून रखडल्याने शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली
  • कामाची संथ गती आणि नागरिकांचे हाल
  • व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले, शेतीमालाचे नुकसान
Satara News : तीर्थक्षेत्र आणि पर्यटन केंद्र असलेल्या वाई शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामात होत असलेल्या प्रचंड दिरंगाईमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांचा संयम आता सुटला आहे. वाई–महाबळेश्वर रस्ता आणि वाई एमआयडीसी मार्गाचे नूतनीकरण गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने शहराची वाहतूक व्यवस्था आणि व्यापार पूर्णपणे कोलमडला आहे. या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वाई नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पार पडली.

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा; पुणे जिल्ह्यातील 10 पंचायत समित्या ताब्यात

कामाची संथ गती आणि नागरिकांचे हाल

या बैठकीत उपस्थित नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदारांवर प्रश्नांची सरबत्ती केली. शहरात येणारे बहुतेक सर्व रस्ते खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. काम पूर्ण करण्यासाठी कोणतीही निश्चित वेळमर्यादा पाळली जात नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उडणाऱ्या धुळीमुळे वाईकरांचे आरोग्य धोक्यात आले असून, अर्धवट कामांमुळे रोज लहान-मोठे अपघात घडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले, शेतीमालाचे नुकसान

रस्त्यांच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका स्थानिक बाजारपेठेला बसला आहे. रस्ते खोदल्यामुळे ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली असून, अनेक छोट्या व्यावसायिकांचे उत्पन्न ठप्प झाले आहे. काही दुकानदारांनी तर “दुकान बंद ठेवण्याची वेळ आली आहे” अशी हतबलता व्यक्त केली. दुसरीकडे, रस्त्यावरील धुळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे, विशेषतः फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, ज्यामुळे आर्थिक संकट गडद झाले आहे.

प्रशासनाला अल्टिमेटम

बैठकीदरम्यान उपस्थितांनी एकमुखाने मागणी केली की, रस्त्यांची कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित पाणी फवारणी करावी आणि खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीला नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह दीप्ती पिसाळ, तेजपाल वाघ, जितू पिसाळ, यशवंत जमदाडे, रोहित वाडकर यांसह नगरसेवक, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या बैठकीनंतर तरी वाईच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Kolhapur News : एसटीची डिजिटल मोहीम ; एनसीएमसी कार्डाची नोंदणी नसल्याने खेड्यात उडाला पुरता फज्जा

Web Title: Wai road construction delay protest traders citizens meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Bad Road
  • Satara
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
1

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
3

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा
4

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.