Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा सिंचन मंडळाचे कार्यालय होणार बंद? राज्य सरकारच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने प्रशासकीय सुसूत्रता आणणे आणि सरकारी खर्चात कपात करण्याच्या नावाखाली सातारा जिल्ह्यातील जलसंपदा कार्यालयांची मोठी पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 08, 2026 | 06:19 PM
( फोटो सौजन्य : AI )

( फोटो सौजन्य : AI )

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्ह्यातील जलसंपदा कार्यालयांची मोठी पुनर्रचना
  • अनेक कार्यालयांचे मुख्यालयेही बदलण्यात आली
  • जागेचे खाजगीकरण करण्याचा हा डाव तर नाही ना?
Satara News : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने प्रशासकीय सुसूत्रता आणणे आणि सरकारी खर्चात कपात करण्याच्या नावाखाली सातारा जिल्ह्यातील जलसंपदा कार्यालयांची मोठी पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पुणे मुख्य अभियंता कार्यालयांतर्गत असलेले ‘सातारा सिंचन मंडळ कार्यालय’ कायमचे बंद करण्याचे प्रस्तावित असून, त्याचा संपूर्ण कार्यभार आता सातारा पाटबंधारे प्रकल्पाकडे सोपवण्यात येणार आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.

सावकार दाम्पत्यावर पोलिसांची कारवाई! १० टक्के व्याजाचा नागरिकांभोवती फास; गुन्हा दाखल

पुनर्रचनेचा मोठा फटका

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कामात एकवाक्यता आणण्यासाठी या पुनर्रचनेला मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फटका सातारा जिल्ह्यातील ‘धोम कालवे विभाग क्रमांक दोन’ ला बसणार आहे. या विभागांतर्गत येणारी तब्बल १३ उपविभागीय कार्यालये आता बंद केली जाणार आहेत. यामध्ये धोम डावा कालवा, कण्हेर भूमी संपादन, पुनर्वसन आणि लघुपाटबंधारे यांसारख्या महत्त्वाच्या उपविभागांचा समावेश आहे. संबंधित विभागांची कामे पूर्णत्वाकडे आल्याचे कारण देत प्रशासनाने हा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात यामुळे प्रशासकीय गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे.

कार्यालयांचे स्थलांतर आणि लाखो रुपयांचा चुराडा

या पुनर्रचनेमुळे केवळ कार्यालये बंद होणार नाहीत, तर अनेक कार्यालयांचे मुख्यालयेही बदलण्यात आली आहेत. उरमोडी धरण विभागाचे मुख्यालय आता सातारा शहरातून थेट नागठाणे येथे हलवण्यात आले आहे, तर जिहे-कटापूर उपसा सिंचन विभागाचे कार्यालय खटाव तालुक्यातील नेर येथे स्थलांतरित होणार आहे. विशेष म्हणजे, सातारा येथील सिंचन भवन परिसरात ‘गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या’ मॉडेलसाठी शासनाने ५० लाख रुपये खर्च केले होते. आता हे कार्यालय नेरला हलवल्यामुळे हा लाखो रुपयांचा खर्च पूर्णपणे पाण्यात जाणार आहे. नवीन ठिकाणी वसाहत आणि कार्यालया उभारणीसाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च अपेक्षित असल्याने, ही कसली ‘काटकसर’ असा जळजळीत प्रश्न कर्मचारी आणि नागरिक विचारत आहेत.

खाजगीकरणाचा डाव?

या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची मोठी ओढाताण होणार असून, शेतकऱ्यांनाही आपल्या कामांसाठी आता नवीन मुख्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. पाटबंधारे विभागाच्या शहरातील मोक्याच्या जागा बंद करून त्या जागेचे खाजगीकरण करण्याचा हा डाव तर नाही ना, अशी शंका आता कर्मचारी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या ‘सुसूत्रतेच्या’ निर्णयामुळे सिंचन व्यवस्थेवर काय परिणाम होतो, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

Amravati News : पूर्णा नदी पात्रात पोकलेनचा ‘धुमाकूळ’, प्रशासनावर प्रश्नचिन्ह; रेतीचा बेकायदेशीर उपसा सुरुच

Web Title: Satarairrigation department office closure reorganisation news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Radhakrishna Vikhe Patil
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
1

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर
2

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
3

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान
4

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.