Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : गणेशोत्सव शांततेत साजरा करा; DJ-डॉल्बीला पोलिसांचा नकार

Satara News : सातारा जिल्ह्यात म्हलारपेठ गणेशोत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. DJ, डॉल्बी आणि नागरिकांना त्रासदायक ध्वनिवर्धक साधनांचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 06, 2026 | 08:20 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
  • DJ-डॉल्बी टाळा; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या
  • मिरवणुकीत वाहतुकीला अडथळा नको; नियमांचे पालन करा
Satara News : गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी धार्मिक, सामाजिक व पारंपरिक भावनेतून गणेशोत्सव साजरा करावा. उत्सवाला गालबोट लागेल किंवा नागरिकांना त्रास होईल, अशा बाह्य साधनांचा वापर टाळावा. विशेषतः डीजे, डॉल्बी व मानवजीवनास त्रासदायक ध्वनिवर्धक साधनांचा वापर करू नये, त्याच पर्यायी म्हणून पारंपारिक वाद्याचा वापर करावा तसेच शासन व पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी सुदाम पाचोरकर यांनी केले.

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

मल्हारपेठ, ता. पाटण येथे सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून मंडळांना विविध सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत काटकर, वरिष्ठ पोलीस कर्मचारी, पोलीस शांतता कमिटीचे भैय्यासाहेब मुलानी, दयानंद शीलवंत प्रभाकर नलवडे तसेच कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील, सरपंच उपसरपंच आणि सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पांना मोदकच का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

DJ-डॉल्बी टाळा; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत काटकर यांनी सांगितले की, गणेशमूर्ती स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची मंडळांनी दक्षता घ्यावी.

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!

मिरवणुकीत वाहतुकीला अडथळा नको; नियमांचे पालन करा

ध्वनिप्रदूषणासह इतर कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, याची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा उत्सव असून, कोणत्याही अनुचित प्रकारामुळे त्याला गालबोट लागू नये, यासाठी सर्व गणेश मंडळांनी जबाबदारीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. तसेच नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता मंडळ पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Satara news celebrate ganeshotsav peacefully police deny permission for dj and dolby systems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Satara News
  • Satara Police

संबंधित बातम्या

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा
1

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक; ‘राजधानी’ मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय, व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
2

मराठा आरक्षणासाठी सातारा बंदची हाक; ‘राजधानी’ मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय, व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ‘सातारा बंद’चे आवाहन; राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय
3

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ‘सातारा बंद’चे आवाहन; राजधानी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचा साताऱ्यात मूक मोर्चा; 28 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा
4

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचा साताऱ्यात मूक मोर्चा; 28 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.