Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू

Satara News : सातारा जिल्ह्यातील बावधन परिसरात प्रस्तावित खाणपट्ट्याविरोधात ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले खाणपट्ट्यामुळे परिसरातील पर्यावरण, शेती आणि स्थानिक नागरिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 02, 2026 | 05:55 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

Satara News : बावधन, म्हातेकरवाडी, अनपटवाडी, वाघजाईवाडी, कणूर व दरेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी बावधन येथील तामखडा शिवारातील गट क्रमांक ३१६६/३ मध्ये खडी स्टोन क्रशर व गौण खनिज खाणपट्टा सुरू करण्यास दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ बुधवारपासून (दि. २) वाई तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून ग्रामस्थांकडून या खाणपट्ट्यास विरोध केला जात असून, ग्रामसभांचे ठराव तसेच जिल्हाधिकारी, महसूल विभाग व पर्यावरण विभागाकडे हरकत व तक्रार अर्ज साद करण्यात आले आहेत. मात्र, ग्रामस्थांचा विरोध असतानाही खाणपट्ट्याच्या संदर्भात परवानगी व मोजणीची कार्यवाही सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

GI मानांकन मिळूनही कोरेगावचा घेवडा पीक विम्यापासून वंचित! अमित भोईटेंची कृषी उपसंचालकांकडे ‘ही’ मागणी

खाण व क्रशर सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात धूळ व वायुप्रदूषण होऊन शेती, पाणी स्रोत, भूजल पातळी तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच परिसरातील पाझर तलाव, शेतकऱ्यांच्या विहिरी, नागेवाडी कॅनॉल, म्हातेकरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची टाकी व गावठाण यांनाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी

दरम्यान, गट क्रमांक ३१६६/३ मधील खाणपट्ट्यास दिलेली परवानगी कायमस्वरूपी रद्द करावी, बावधन पंचक्रोशीत भविष्यात खाणपट्टा व क्रशरसाठी परवानगी देऊ नये तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

उपोषणकर्ते गणेश रामचंद्र भोसले, निलेश यशवंत भोसले व चंद्रकांत आत्माराम सुतार असून, मागण्यांवर लेखी व समाधानकारक निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Satara news indefinite hunger strike launched against mining leases in the bavdhan area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

१ kv सोलर रूफटॉप योजनेला पसरणीतून सुरुवात; ‘लाईट बिलमुक्त गाव’ मोहिमेला मिळतोय प्रतिसाद
1

१ kv सोलर रूफटॉप योजनेला पसरणीतून सुरुवात; ‘लाईट बिलमुक्त गाव’ मोहिमेला मिळतोय प्रतिसाद

GI मानांकन मिळूनही कोरेगावचा घेवडा पीक विम्यापासून वंचित! अमित भोईटेंची कृषी उपसंचालकांकडे ‘ही’ मागणी
2

GI मानांकन मिळूनही कोरेगावचा घेवडा पीक विम्यापासून वंचित! अमित भोईटेंची कृषी उपसंचालकांकडे ‘ही’ मागणी

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी
3

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण
4

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.