Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : युद्धाच्या झळा पाचगणीलाही, कमर्शियल गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत

जागतिक स्तरावर आर्थिक आणि पुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून त्याचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन तसेच गॅस पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 14, 2026 | 08:03 PM
Satara News : युद्धाच्या झळा पाचगणीलाही, कमर्शियल गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत
Follow Us
Follow Us:
  • गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी
  • हॉटेल व्यावसायिकांनाच चुलीचा आधार
  • स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका
Satara News :  इराण–इस्त्राईल–अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर आर्थिक आणि पुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून त्याचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन तसेच गॅस पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचाच फटका पाचगणीसारख्या पर्यटननगरीतील हॉटेल व्यवसायाला बसू लागला असून कमर्शियल गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

Mumbai-Ahmedabad मार्गावर धावणार भारतीय बनावटीची Bullet Train कधी धावणार? वाचा सविस्तर अपडेट

गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी

पाचगणी–महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून येथे वर्षभर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार मानला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून कमर्शियल गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहेत. काही ठिकाणी हॉटेल स्टाफसाठी स्वयंपाक करण्यासाठी चक्क पारंपरिक चूल पेटवण्याची वेळ आली आहे. आधुनिक स्वयंपाकघर असतानाही इंधनाअभावी चुलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

हॉटेल व्यावसायिकांनाच चुलीचा आधार

सामान्यतः धाब्यावरील चुलीवरच्या जेवणाला पर्यटक पसंती देतात; मात्र आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, हॉटेल व्यावसायिकांनाच चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. युद्ध सुरू होऊन सुमारे १३ दिवसांचा कालावधी उलटला असून त्याचे परिणाम पाचगणी–महाबळेश्वर परिसरात जाणवू लागले आहेत. गॅसचा तुटवडा वाढल्यास पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका

या परिस्थितीमुळे काही हॉटेल धारक पर्यटकांकडून बुकिंग घेताना जेवणाची सुविधा देण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट सांगत आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक केवळ निवासासाठीच हॉटेलची निवड करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. युद्धाची परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

मेनूकार्डमधून पदार्थ गायब होण्याची शक्यता

कमर्शियल गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेलांच्या रसोईघरातील मेनूकार्डवरील काही पदार्थ हळूहळू गायब होऊ लागले आहेत. स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्याने अनेक पदार्थ तयार करणे शक्य होत नाही. त्यामुळे उद्या स्नॅक सेंटरवरील वडापावसारखे लोकप्रिय पदार्थही उपलब्ध नसल्यास नवल वाटण्यासारखे राहणार नाही, अशी चर्चा व्यावसायिकांमध्ये सुरू आहे.

Missing link project: मुंबई-पुणे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण; पहा ड्रोन दृश्ये

घरगुती गॅससाठी प्रतीक्षा वाढली

घरगुती सिलेंडरला शासनाने ग्राहकांना प्राधान्य दिले असून घरगुती गॅस मिळण्यासाठी आता सुमारे ३० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. पूर्वी हा कालावधी २१ दिवसांचा होता. परिणामी अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढू लागली असून स्वयंपाकासाठी कोळशालाही पुन्हा महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे.

Web Title: Satara news panchgani hotel industry hit by commercial gas shortage due to war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • hotel
  • Israel Iran war
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
1

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार – डॉ. प्रिया शिंदे
2

एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार – डॉ. प्रिया शिंदे

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा
3

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
4

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.