Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

Sajjangad : सज्जनगडाच्या दिशेने जाणाऱ्या घाटमाथ्यावर डोंगराचा एक मोठा भाग अचानक कोसळला. ज्यामुळे सज्जनगडावर असलेले पर्यटक व स्थानिक नागरिक फसले गेले. यामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात ट्राफिक झाली होती.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 24, 2026 | 09:41 PM
Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

Follow Us
Follow Us:
  • ब्लास्टिंगच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह
  • दरड कोसळल्याने पर्यटकांची गैरसोय
  • तातडीने तपासणीची मागणी
साताऱ्याच्या धार्मिक आणि पर्यटन नकाशावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या सज्जनगडाकडे (Sajjangad) जाणाऱ्या घाटरस्त्यावर गुरुवारी सायंकाळी डोंगराचा मोठा कडा अचानक कोसळला. प्रचंड मोठ्या दरडीसह दगड-मातीचा ढिगारा मुख्य रस्त्यावर आल्याने सज्जनगड घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे गडावर दर्शनासाठी गेलेले भाविक, पर्यटक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत सापडले.

रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगच्या पद्धतीवर या घटनेनंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या उपाययोजना न करता डोंगर फोडण्याचे काम सुरू असल्यामुळेच दरड कोसळल्याचा आरोप स्थानिक नागरिक व पर्यटकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित कामाची तांत्रिक पाहणी करून ब्लास्टिंगसाठी आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

 

दरड कोसळल्याने पर्यटकांची गैरसोय

दरड कोसळल्यानंतर घाटरस्त्यावर मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा साचला. त्यामुळे सज्जनगडाकडे जाणारी तसेच गडावरून परतणारी वाहने मार्गातच अडकली. अचानक वाहतूक बंद झाल्याने भाविक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. काही काळ या परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीसह अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने रस्त्यावरील दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, डोंगराच्या कड्यावर अजूनही धोकादायक स्थिती असल्यास सुरक्षिततेची खात्री करूनच वाहतूक सुरू करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Mumbai cha Raja : बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीतच आलं विघ्न, म्हणून ‘मुंबईचा राजा’चं शुक्रवारी विसर्जन नाही?

तातडीने तपासणीची मागणी

रुंदीकरण आवश्यक असले तरी त्यासाठी भाविकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही ना? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. ब्लास्टिंगचे नियोजन, सुरक्षाव्यवस्था आणि कामाची तांत्रिक पद्धत याची प्रशासनाने तातडीने तपासणी करण्याची मागणी होत आहे.
दरड पूर्णपणे हटवून रस्ता सुरक्षित होईपर्यंत नागरिकांनी सज्जनगड घाटातून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

Web Title: Sajjangad fort road blassting tourist in traffic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • Satara
  • Traffic

संबंधित बातम्या

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
1

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा
2

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीचा ‘मेगा प्लॅन’, प्रमुख रस्ते राहणार बंद…
3

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीचा ‘मेगा प्लॅन’, प्रमुख रस्ते राहणार बंद…

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
4

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.