Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: कोट्यवधींची इमारत, पण औषधे गायब!; पाटण रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून भाजपचे शंकर घाडगे आक्रमक

अंगणवाडी भरतीप्रसंगी १४६ पैकी ६० ठिकाणी अर्जच प्राप्त झाले नसल्याची माहिती एकात्मिक बाल विकासमार्फत देण्यात आली. तर रस्त्याकडेला, गावाबाहेर कचऱ्याचे ढिग लागले असून ते संबंधितांना तत्काळ उचलण्याच्या सूचना उपसभापती पवार यांनी केल्या.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 06, 2026 | 01:07 PM
Satara News: कोट्यवधींची इमारत, पण औषधे गायब!; पाटण रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून भाजपचे शंकर घाडगे आक्रमक
Follow Us
Follow Us:
  • सभेचा ‘कोणतीही बदली न करण्याचा’ ठराव असताना नुने येथील शिक्षिकेची बदली साताऱ्यात कशी झाली?
  • काम साताऱ्यात आणि पगार पाटणला निघत असेल तर संबंधित शिक्षिकेचा पगार तात्काळ रोखा.
  • तलाठी आणि ग्रामसेवकांनी प्रत्यक्षात जागेवर जाऊन तात्काळ पंचनामे सादर करावेत.
Patan Rural Hospital Facilities Row : पाटण ग्रामीण रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव असून कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. रात्रीच्यावेळी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधे मिळत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहे. स्वच्छतागृहाची दुरवस्था आहे. सुविधा मिळत नाहीत. मग कोट्यवधी रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधून उपयोग काय? असा संतप्त सवाल करून अत्याधुनिक इमारत उभारून अपेक्षित फायदा रुग्णांना मिळणार नाही. लोकनेत्यांच्या नावाने असलेल्या पाटण ग्रामीण रुग्णालयाची सेवा आणि व्यवस्था त्या नावाला साजेशी असणे गरजेचे आहे, अशी भावना भाजपचे विरोधी सदस्य शंकर घाडगे यांनी सभागृहात व्यक्त केली.

पाटण पंचायत समितीच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात सभापती सौ. सविता पवार यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी उपसभापती विजय पवार, गटविकास अधिकारी सरिता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच कोयना जलाशयाला छ. शिवाजी महाराज कोयना जलसागर नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

Manoj Jarange Patil: ‘तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका’; फडणवीस-शिंदे-बावनकुळे-विखेंवर जरांगेंचा हल्लाबोल

पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणून घ्याव्यात आणि रिक्त पदे तातडीने भरून, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासह स्वच्छतागृह व परिसराची स्वच्छता सुधारावी, अशी मागणी सदस्य घाडगे यांनी केली. यावर उपसभापती विजय पवार यांनी दवाखान्यात रात्रीचे कर्मचारी असलेच पाहिजेत. मुदत संपलेली औषधे ठेऊ नका, रुग्णालयात स्वछता राखलीच पाहिजे, महिनाभरात सुधारणा झाली पाहिजे, अशा सूचना दिल्या.

कोणतीही बदली न करण्याचा ठराव सभेत झाला असताना याशिवाय आपल्याकडे अपुरे शिक्षक असतानाही नुने येथील शिक्षकाची बदली कोणाला विचारून केली असा सवाल करत कामाला सातारा येथे आणि पगार पाटणला निघत असेल तर संबंधित शिक्षिकेचा पगार थांबवा, अशा सूचना उपसभापती विजय पवार यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या.

अतिवृष्टीतील ८ गावांतील ग्रॅव्हीटी व चेंबर वाहून गेल्याची माहिती आली आहे. यापैकी एका गावचा पंचनामा झाल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. नुकसान झाले त्याच दिवशी पंचनामा झाला पाहिजे. तलाठी, ग्रामसेवकांना घेवून जाग्यावर जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना उपसभापती पवार यांनी केल्या.

कृषी विभागाच्या आढाव्या वेळी ४०६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जुलै ते ऑगस्टमधील अतिवृष्टीचे पंचनामे झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कृषी सहाय्यक फोन उचलत नसल्याची तक्रार सदस्या विद्या शिंदे यांनी केली. यावर संताप व्यक्त करत उपसभापती पवार यांनी नुकसानीचे १०० टक्के पंचनामे का केले नाहीत? अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. कृषी सहाय्यकांनी फोन न उचलणे हे चालणार नाही. तातडीने पंचनामे १०० टक्के झाले पाहिजेत. एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, अशा उपसभापती पवार यांनी सक्त सूचना केल्या तर सुरुल बंधाऱ्याच्या पलीकडे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून अधिकारी दाद देत नाहीत. कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप सदस्य शंकर घाडगे यांनी केला.

खड्डे तात्पुरते भरा. तळीये मणेरी येथे शाळे जवळ धोकादायक झाडे असून ती अजून काढली नाहीत. दुर्घटना घडल्यावरच काढणार का? असा सवाल उपसभापती पवार यांनी करत धोकादायक झाडे तत्काळ काढण्याच्या सूचना बांधकाम अधिकाऱ्यांना केल्या. सडावाघापूर येथे पर्यटनस्थळी थार गाडी चालकाने स्टंटबाजी करत नुकसान केले होते त्यावर कारवाई केल्याचे वनविभागाने सांगितले.

Bharatpol Digital Platform: ‘भारतपोल’ प्लॅटफॉर्मने बदलला तपासाचा चेहरा; ७ वर्षांत ३६ देशांतून २७४ गुन्हेगारां

तालुका आरोग्य अधिकारी शिकलगार मॅडम यांनी पाटण ग्रामीण रुग्णालयात पाच कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने रुग्णांना सेवा देताना अडचणी येत असल्याचे सांगितले. सौरऊर्जा योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे वीज वितरणकडून सांगण्यात आले. पाटण एस. टी. महामंडळाकडे १० व १३ अशा नवीन २३ व पूर्वीच्या मिळून एकूण ६० बसेस आहेत. मात्र ३५ चालक, वाहक कमी आहेत. २७० ग्रामीण भागात फेऱ्या सुरू असल्याचे सांगितले. सदस्य प्रशांत पवार यांनी कराड-पाटणसाठी ८० रुपये तिकीट घेतले जात असल्याची तक्रार केली. ११ रुपये ज्यादा का घेतले जातात अशी विचारणा केली. भूमी अभिलेख कार्यालयात कामेच होत नाहीत. मोजणीसाठी पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप सदस्य प्रशांत पवार यांनी केला.

 

 

 

 

Web Title: Satara news patan panchayat samiti monthly meeting hospital facilities and teacher transfer row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 01:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.