Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : रस्तारुंदीकरणाची कामे दर्जेदार करा; सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सूचना

सातारा लोणंद मार्गावरील वाढे येथील वेण्णा पूल व आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाची कामे तातडीने सुरू करा हा मार्ग रुंद करण्यात यावा, अशा तातडीच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 31, 2025 | 12:59 PM
Satara News : रस्तारुंदीकरणाची कामे दर्जेदार करा; सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सूचना
Follow Us
Close
Follow Us:
  • रस्तारुंदीकरणाची कामे दर्जेदार करा
  • सेवा रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा
  • साताऱ्यातील बैठकीत सार्वजनिकबांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सूचना

सातारा : सातारा-लोणंद-शिरवळ हा महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. सातारा लोणंद मार्गावरील वाढे येथील वेण्णा पूल व आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाची कामे तातडीने सुरू करून येथील मार्ग रुंद करण्यात यावा, अशा तातडीच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संतोष रोकडे, सातारा प्रांत आशिष बारकुल, भूसंपादन उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, सातारा तहसीलदार समीर यादव, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव इत्यादी उपस्थित होते.

Kolhapur News : ऊसदराच्या मुद्द्यावरुन आंदोलन चिघळलं; कोल्हापुरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; वाहने पेटवण्याचा प्रयत्न

सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले, सातारा-लोणंद-सुपे ते केडगाव महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या जबाबदारीने हे काम करणार असून सातारा लोणंद मागाँवरील वेण्णा पूल आरळे येथील कृष्णा पुलाच्या रुंदीकरणाची कामे तातडीने हाती घेतली जातील, रस्ते येथील अरुंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, बाहे वडूत शिवथर आरळे येथून बायपास काढावा. मार्गाचे काम करताना झाडे तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. झाडांचे पुनर्रोपण करावे. रुंदीकरण झाल्यावर वृक्षारोपणाकडे लक्ष देऊन त्याचे जिओ टॅगिंग करावे. झाडांचे संवर्धन केल्यानंतरच ठेकेदाराचे बिल काढले जावे ही कामे दर्जेदार व्हावीत येथे तडजोड होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना मंत्री शिवेंद्रराजे यांनी ठेकेदारांना दिल्या.

उड्डाणपुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा

रायगाव फाटा व वाढे फाटा येथे सेवा रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होईल. रस्त्याच्या दुतर्फा समतल गटारे करण्यात यावी, नसरापूर येथे खड्ढे पडल्याने महामार्गाची दुरुस्ती करावी, कराड महामार्ग उड्डाणपुलाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण झाले पाहिजे, येथील स्ट्रीट लाईट तातडीने सुरू व्हाव्यात, अशा सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या.

सेवा रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा कोल्हापूर महामार्गाच्या कामा संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्‌यात मुंबई येथे बैठक होणार आहे. या महामार्गावर सात ते आठ तास वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. साखर कारखान्याचे हंगाम सुरू होणार असल्याने महामार्गावर वाहतूक वाढणार आहे. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. महामागांच्या सेवा रस्त्यांची सुद्धा तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा

Web Title: Satara news road widening work should be done with quality public works minister shivendrasinghraje bhosales instructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • kolhapur
  • Marathi News
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण
1

पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण

Raigad News : अलिबागला फिरायला जाताय मग बातमी एकदा वाचाच; पुलाचे खांब निकामी; प्रशासनाचे दुर्लक्ष; मांडवा जेट्टी कोसळण्याची भिती
2

Raigad News : अलिबागला फिरायला जाताय मग बातमी एकदा वाचाच; पुलाचे खांब निकामी; प्रशासनाचे दुर्लक्ष; मांडवा जेट्टी कोसळण्याची भिती

Raigad Crime : हातात तलवारी, लोखंडी शिगा, अन् खुनाचा प्रयत्न; जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि 21 जणांना न्यायालयाने ठोठावली शिक्षा
3

Raigad Crime : हातात तलवारी, लोखंडी शिगा, अन् खुनाचा प्रयत्न; जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि 21 जणांना न्यायालयाने ठोठावली शिक्षा

Kolhapur News : कानडी-मराठी ‘सीमावाद’ आणखीनच चिघळला; मराठी भाषिकांचा एल्गार; काळा दिवस पाळणार
4

Kolhapur News : कानडी-मराठी ‘सीमावाद’ आणखीनच चिघळला; मराठी भाषिकांचा एल्गार; काळा दिवस पाळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.