Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासकीय जागेच्या वापरावरून सातारा क्लब वादाच्या भोवऱ्यात, माहिती अधिकारातून उघड झाले प्रश्न; सदस्यांनी चौकशीची केली मागणी

साताऱ्यातील ऑफिसर्स क्लबच्या नोंदणीपूर्व मद्यविक्री आणि प्रशासकीय कारभारावर सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांनी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 11, 2026 | 09:39 PM
शासकीय जागेच्या वापरावरून सातारा क्लब वादाच्या भोवऱ्यात

शासकीय जागेच्या वापरावरून सातारा क्लब वादाच्या भोवऱ्यात

Follow Us
Follow Us:

 

  • शासकीय जागेच्या वापरावरून सातारा क्लब वादाच्या भोवऱ्यात
  • माहिती अधिकारातून उघड झाले प्रश्न
  • सदस्यांनी चौकशीची केली मागणी
सातारा दि. ११ (प्रतिनिधी): सातारा येथील प्रसिद्ध ऑफिसर्स क्लबच्या कार्यपद्धतीवर आणि जागेच्या वापरावरून नव्याने वाद निर्माण झाला आहे. क्लबच्या नोंदणीपासून ते आर्थिक व प्रशासकीय व्यवहारांपर्यंत अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागत क्लबचे सदस्य हनुमंत फरांदे आणि त्यांचे विधिज्ञ प्रतिनिधी ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांनी संबंधित विभागांकडे चौकशीची मागणी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. पाटील-शिरगावकर यांनी सांगितले की, क्लबची खाजगी स्वरूपातील नोंदणी ६ जानेवारी २०२३ रोजी झाली असली तरी त्याआधीपासूनच त्या ठिकाणी विविध उपक्रम आणि मद्यविक्री सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे नोंदणीपूर्व काळात संबंधित परवानग्या कोणत्या नियमांनुसार देण्यात आल्या, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
त्यांच्या मते, उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या परवानग्यांची आणि त्यामागील प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. “नियमांचे पालन झाले का, हे स्पष्ट व्हायला हवे,” असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, क्लबचे जीवन सदस्य असल्याचा दावा करणारे हनुमंत फरांदे यांनीही क्लबच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, २००३ साली जीवन सदस्यत्व घेतल्यानंतर त्यांनी अनेक सभांमध्ये आर्थिक व्यवहार आणि प्रशासनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आपले सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. फरांदे यांच्या मते, क्लबमधील निर्णयप्रक्रियेत सर्व सदस्यांना समान संधी दिली जात नाही. “कारभारात अधिक पारदर्शकता आवश्यक आहे. सदस्यांना माहिती सहज उपलब्ध व्हायला हवी,” असे ते म्हणाले.

साताऱ्यात रंगणार कुस्तीचा महासंग्राम! २२ वर्षांनंतर ‘हिंदकेसरी’चे यजमानपद; विजेत्या मल्लावर होणार बक्षिसांचा वर्षाव

या प्रकरणात विविध शासकीय विभागांकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविण्यात आली होती. मात्र काही विभागांकडून अपूर्ण किंवा संदिग्ध उत्तरे मिळाल्याची तक्रारही करण्यात आली. “संपूर्ण माहिती स्पष्टपणे सार्वजनिक व्हावी,” अशी मागणी ॲड. पाटील-शिरगावकर यांनी केली.

क्लब ज्या जागेवर कार्यरत आहे त्या जागेच्या मालकी व वापराबाबत महसूल आणि स्थानिक प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत आवश्यक कागदपत्रे व परवानग्या सार्वजनिक कराव्यात, असेही सांगण्यात आले. सातारा क्लबच्या कारभारावर उपस्थित झालेल्या या प्रश्नांमुळे आता संबंधित विभागांकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि पुढे चौकशीची प्रक्रिया कशी होते, याकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीवरून जावळी पंचायत समितीत खडाजंगी; शिल्पा शिंदेंसह सदस्य आक्रमक

Web Title: Satara officers club dispute registration liquor license investigation demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
1

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
2

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
3

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
4

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.