Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Shetti Threatens Kata Bandh Satara: ऊस दराचा तिढा सुटेपर्यंत ‘काटा बंद’! ; राजू शेट्टींचा साखर कारखानदारांना थेट इशारा

Satara Politics: इथेनॉलचा खरेदी दर प्रतिलिटर ७० रुपये करण्यासह साखरेची एमएसपी वाढवावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. पेट्रोलचे दर वाढत असताना इथेनॉलचे दर मात्र वाढविले जात नाहीत.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 05, 2026 | 04:16 PM
Raju Shetti Satara, Ajinkyatara Sugar Factory, Sugarcane Rate Dispute

Raju Shetti Satara, Ajinkyatara Sugar Factory, Sugarcane Rate Dispute

Follow Us
Follow Us:
  • ऊस दराचा तिढा सुटेपर्यंत सातारा जिल्ह्यात ‘काटा बंद’ आंदोलनाचा राजू शेट्टींचा इशारा.
  • अजिंक्यतारा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद पाडण्याचा इशारा.
  • इथेनॉलचा खरेदी दर प्रतिलिटर ७० रुपये करण्याची आणि साखरेची MSP वाढवण्याची मागणी
Satara Politics: ऊस दराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करू नये. अजिंक्यतारा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास ‘काटा बंद’ आंदोलन छेडून जिल्ह्यातील एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला. अजिंक्यतारा कारखान्याला भेट देऊन त्यांनी प्रशासनाशी चर्चा केली.

इथेनॉलचा खरेदी दर प्रतिलिटर ७० रुपये करण्यासह साखरेची एमएसपी वाढवावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. पेट्रोलचे दर वाढत असताना इथेनॉलचे दर मात्र वाढविले जात नाहीत. दुसरीकडे साखरेची एमएसपी अनेक वर्षांपासून स्थिर आहे. या धोरणामुळे शेतकरी आणि कारखानदारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Supreme Court Hearing Gyanesh Kumar SIR Case: ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा

केंद्र सरकार साखर कारखाने लवकर सुरू करण्यासाठी कारखानदारांवर दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी सणासुदीत साखरेचे दर वाढू नयेत, बाजारात नवीन साखर उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्राची ही घाई सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. ‘शेतकरी आणि कारखानदारांनी तोटा सहन करायचा आणि केंद्राने बाजारासाठी साखर उपलब्ध करून घ्यायची, हे मान्य नाही,’ असे शेट्टी यांनी सुनावले.

लवकर ऊस तोडणी केल्यास रिकव्हरी आणि वजन घटून शेतकऱ्यांचे एकरी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिकव्हरी आणि वजन वाढल्यानंतरच गाळप सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. कमी प्रतीचा ऊस घाईने कारखान्याला देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

दरम्यान, १२ ऑक्टोबरला दिल्ली येथे केंद्रातील संबंधित मंत्र्यांसोबत महाराष्ट्र-कर्नाटकातील शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. केंद्राची भूमिका पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक शिवाजी मोहिते यांनी, कारखाना सध्या बंद असून संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

 

Web Title: Satara raju shetti threatens kata bandh in satara over sugarcane price dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Raju Shetti
  • Satara Politics
  • Swabhimani Shetkari Sanghatana

संबंधित बातम्या

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान
1

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचं राजकारण तापणार; रामराजे, शिवेंद्रसिंहराजे अन् मकरंद पाटलांची खलबते
2

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचं राजकारण तापणार; रामराजे, शिवेंद्रसिंहराजे अन् मकरंद पाटलांची खलबते

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?
3

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.