Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

Satara News: इंटरॲक्टिव्ह इंटेलिजंट पॅनेल व स्पोर्ट किट दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय लक्ष्मण पिसे तसेच केंद्रप्रमुख विनायक काटकर यांनी अभिनंदन केले. बनसोडे सर व हजारे सर यांच्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 11, 2026 | 08:38 PM
Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील बालभवन येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही घोषणा केली.
  • शिक्षण विभागाचे संचालक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष शाळांमध्ये ४ दिवस थांबून परिस्थितीची पाहणी करतील.
  • निधीच्या मर्यादेवर न थांबता स्थानिक पातळीवरील पुढाकार आणि लोकसहभागातून शाळांचे सौंदर्य व स्वच्छता वाढवण्याचे आवाहन
Satara News: माण तालुक्यातील म्हसवड बीट अंतर्गत वरकुटे – मलवडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेनवडी ही आज डिजिटल साधनांच्या द्वारे शिक्षण देत आहे. त्यासाठी गावच्या विद्यमान सरपंच सौ. जयश्री मोहन कदम व माजी सरपंच मोहन विठोबा कदम या दांपत्याने मुलांच्या शिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणून १ लाख १६ हजार रुपये किमतीचा ‘इंटरॲक्टिव्ह इंटेलिजंट पॅनेल बोर्ड’ दिला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य — वह्या, कंपास, पेन, पाटी, लेखन साहित्य आदींचे वाटप करून आपल्यातील दातृत्व दाखवून दिले.

जयश्री कदम व मोहन कदम हे दोघेही दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात ओळखले जातात. शाळेच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. सदर डिजिटल पॅनेल बोर्ड नवनीत या कंपनीकडून घेण्यात आला. या कामामध्ये ‘ग्लोबल’ शिक्षक बालाजी जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.

Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप

गतवर्षी मुलांचा यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धेतील चांगला सहभाग पाहून शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष समाधान पांडुरंग खिलारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये किमतीचे स्पोर्ट किट (खेळाचा गणवेश) दिले. येथील जि. प. शाळेतील मुले ही सतत क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपले नैपुण्य दाखवत आहेत, त्यामुळे गावकऱ्यांनी या कलागुणांना वाव देण्यासाठी ही मदत केली आहे.

तसेच गतवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शेनवडी शाळेतील चार विद्यार्थी पात्र ठरले.  बनसोडे सर व हजारे सर हे चांगले काम करत असून शाळेच्या गुणवत्तेचा आलेख उंचावत आहेत, त्याबद्दल गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. शाळेमध्ये योगा, बुद्धिबळ, स्वच्छ व सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा, नियमित शिष्यवृत्तीच्या जादा तासिका, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर आणि मुलांना संगणकाचे ज्ञान या सर्व गोष्टींमुळे ही शाळा नावारूपाला आली आहे.

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत;

इंटरॲक्टिव्ह इंटेलिजंट पॅनेल व स्पोर्ट किट दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय लक्ष्मण पिसे तसेच केंद्रप्रमुख विनायक काटकर यांनी अभिनंदन केले. बनसोडे सर व हजारे सर यांच्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी कार्यक्रमासाठी माजी कृषी सभापती (जि. प. सातारा) शिवाजीराव शिंदे, माजी सरपंच संजय खिलारी, सुरेश कदम सर, सूरज कदम, ग्रामपंचायत सदस्य नंदा खिलारी, हरीश खिलारी, धनाजी कदम, लीनाताई कदम, मनीषा खिलारी, उपसरपंच यशवंत पारशी, प्रकाश खिलारी, नामदेव शिरतोडे सर, ग्रामसेवक विजय आटपाडकर, विकास खिलारी आदी उपस्थित होते.

 

Web Title: Satara shenwadi zp school goes digital interactive board donated by sarpanch couple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • education news
  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
1

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध
2

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर
3

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर

Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर
4

Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.