Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: भुयारी गटार योजनेच्या ठरावावरून सातारा पालिकेत खळबळ; ठेकेदाराला मुदतवाढ दिल्यास कायदेशीर लढ्याचा सुशांत मोरेंचा इशारा

Satara News: साताऱ्यात भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याऐवजी मुदतवाढ देण्याच्या हालचाली? सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा नगरपालिकेला कायदेशीर कारवाईचा इशारा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 05, 2026 | 06:02 PM
Satara News: भुयारी गटार योजनेच्या ठरावावरून सातारा पालिकेत खळबळ

Satara News: भुयारी गटार योजनेच्या ठरावावरून सातारा पालिकेत खळबळ

Follow Us
Follow Us:
  • भुयारी गटार योजनेच्या ठरावावरून सातारा पालिकेत खळबळ
  • ठेकेदाराला मुदतवाढ दिल्यास कायदेशीर लढ्याचा सुशांत मोरेंचा इशारा
  • वाचा सविस्तर बातमी!
सातारा, दि. ५ (प्रतिनिधी): सातारा नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेसंदर्भातील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या ठरावाबाबत नव्याने हालचाली सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुयारी गटार योजनेचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नसून, केवळ सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात देयके अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ही योजना सातारा शहरासाठी महत्त्वाची असून तिची अंमलबजावणी दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र, आता तोच ठराव बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा मोरे यांनी केला.

Satara Politics : माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का; शहापूर सोसायटीचा ठराव घोरपडे गटाकडे

नगरपालिकेने मंजूर केलेल्या ठरावात बदल करून ठेकेदाराला दिलासा देण्याचा प्रयत्न झाल्यास तो जनतेची दिशाभूल करणारा आणि कायदेशीरदृष्ट्या गंभीर प्रकार ठरेल. अशा परिस्थितीत संबंधित निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यासह आवश्यक कायदेशीर पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, ठरावात कोणत्याही प्रकारची फेरफार झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात नगरविकास विभागाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली जाईल, असेही मोरे यांनी सांगितले.

‘समन्वय बैठकी’चा दावा

भुयारी गटार योजनेच्या ठेकेदारासोबत काही पदाधिकाऱ्यांनी समन्वय साधल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू असल्याचा दावा सुशांत मोरे यांनी केला. या प्रकरणात काही प्रमुख व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप करत, योग्य वेळी संबंधितांची नावे जाहीर केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

Satara News: रेशन दुकानदारांचे आर्थिक नुकसान टाळा; POS मशीनचा डेटा ३१ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध ठेवा! साताऱ्यात संघटनेची मागणी

Web Title: Satara underground drainage scheme contractor blacklist controversy marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीचा ‘मेगा प्लॅन’, प्रमुख रस्ते राहणार बंद…
1

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीचा ‘मेगा प्लॅन’, प्रमुख रस्ते राहणार बंद…

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
2

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
3

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
4

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.