Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Water Crisis: सातारा शहरावर पाणीसंकट! सांबरवाडीत भूस्खलनामुळे ‘कास’ योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली

गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसातही नगरपालिका कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काम करणे आव्हानात्मक असले तरी नागरिकांना लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत

  • By anuradha sagar
Updated On: Jul 09, 2026 | 05:09 PM
Satara News, Kaas Water Supply, Sambarwadi Landslide, Satara Municipal Corporation

Satara News, Kaas Water Supply, Sambarwadi Landslide, Satara Municipal Corporation

Follow Us
Follow Us:
  • सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे कास पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती
  • मुसळधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी
  • मुसळधार पावसामुळे उत्खनन आणि दुरुस्तीचे काम वारंवार विस्कळीत.
Satara Water Crisis: सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे कास पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने सातारा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून गेल्या तीन दिवसांपासून युद्धपातळीवर काम सुरू आहे.

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्या तरी नगरपालिका कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. गळती दुरुस्त करून कास पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Maharashtra Politics: शरद पवारांच्या पॉवर गेममुळे महाविकास आघाडीत खळबळ; विधीमंडळात सर्वात मोठा राजकीय सस्पेन्स

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक रवींद्र ढोणे, राजू गोरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यांनी दुरुस्तीचे काम दर्जेदार आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, “गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसातही नगरपालिका कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काम करणे आव्हानात्मक असले तरी नागरिकांना लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.” काम पूर्ण होताच कास योजनेतून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Nagpur Airport: नागपूर विमानतळाचा कायापालट! देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब उभारणार; ‘जीएमआर’ची ₹३२०० कोटींची योजना

कास योजनेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण
सांबरवाडी परिसरातील भूस्खलनामुळे मुख्य जलवाहिनीला गळती निर्माण.
मुसळधार पावसामुळे उत्खनन आणि दुरुस्तीचे काम वारंवार विस्कळीत.
चिखल व घसरडी परिस्थितीमुळे यंत्रसामग्रीच्या वापरात अडथळे.
मुख्य जलवाहिनी असल्याने दुरुस्तीपूर्वी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची गरज.
गळतीची अचूक जागा शोधणे आणि पाइपलाइन सुरक्षितपणे उघडणे ही मोठी तांत्रिक प्रक्रिया.
दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर दाब चाचणी (प्रेशर टेस्ट) करूनच पाणीपुरवठा सुरू केला जाणार.
नागरिकांना कमी त्रास व्हावा यासाठी नगरपालिका आणि संबंधित विभागाकडून पर्यायी उपाययोजनांवर भर

 

Web Title: Satara water crisis kaas scheme disrupted amol mohite inspects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Landslide
  • Satara News

संबंधित बातम्या

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील
1

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
2

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी
3

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी

Satara News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर किशोर सोनवणे यांचे उपोषण अखेर मागे
4

Satara News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर किशोर सोनवणे यांचे उपोषण अखेर मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.