Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : ‘शिवेंद्रसिंहराजेंवर बोलाल तर खबरदार!’ जावळीत महायुतीला घरचा आहेर,जागावाटपाच्या राजकारणावर सौरभ शिंदेंचा थेट निशाणा

Satara News : जिल्हा बँक निवडणुकीतील जावळीच्या मतदानावरून महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बाबाराजेंना जागावाटपात दुय्यम ठरवल्याचा आरोप करत सौरभ शिंदे यांनी शेखर पाटोळेंना थेट सुनावले. आधी महायुतीतील अंतर्गत राजकारणाचा हिशेब द्या, असा पलटवार त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Nov 22, 2026 | 02:33 PM
Jaykumar gore shivendraraje

Jaykumar gore shivendraraje

Follow Us
Follow Us:
  • जावळीतील मतदानावरून महायुतीत राजकीय संघर्ष
  • शेखर पाटोळेंच्या टीकेला सौरभ शिंदेंचे प्रत्युत्तर
  • जागावाटपात बाबाराजेंना दुय्यम ठरवल्याचा आरोप
 

मेढा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर जावळीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानाच्या आकड्यांवरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता महायुतीतील अंतर्गत राजकारणाची किनार मिळाली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसलेना जागावाटपात दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच नाराजीचा फटका मतदानातून दिसून आला, असा थेट आरोप प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी केला आहे. शेखर पाटोळेंच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी चांगलाच समाचार घेतला. (Satara News)

यावेळी सौरभ शिंदे म्हणाले, “जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जावळीत उमटलेला मतदानाचा कौल हा केवळ आकड्यांचा खेळ नसून महायुतीतील वरिष्ठ पातळीवर झालेल्या राजकीय कुरघोड्यांविरोधात कार्यकर्त्यांच्या मनात साचलेल्या असंतोषाचा उद्रेक आहे. जागावाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतलेल्या भूमिकेमुळे बाबाराजेंना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झाला. महायुतीच्या अंतर्गत राजकारणात त्यांना डॉमिनेट करण्याच्या हालचाली झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.”

“ही नाराजी बाबाराजेंच्या कानावरही घालण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचा शब्द आणि महायुतीतील समन्वयाला सर्वोच्च प्राधान्य देत बाबाराजेंनी स्वतःच्या राजकीय ताकदीचा विचार न करता उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. तरीही मतदारांच्या मनातील नाराजी मतपेटीतून बाहेर आली. त्यामुळे जावळीतील मतदानाचे खापर स्थानिक नेतृत्वावर फोडण्यापेक्षा महायुतीतील वरिष्ठांच्या अंतर्गत कुरघोड्यांचा आधी हिशेब द्या,” अशा शब्दांत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी शेखर पाटोळे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Shivendrasinhraje Bhosale : जिल्हा बँकेच्या पराभवाचे खापर माझ्यावर नको! शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप नेत्यांना इशारा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर सुरू झालेला राजकीय कलगीतुरा आता अधिकच रंगू लागला आहे. अर्जुन काळे यांना जावळी मतदारसंघातून अपेक्षित मतदान का मिळाले नाही, यावरून शेखर पाटोळे यांनी शिवेंद्रराजे गटाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता. मात्र, जावळीतील मतदानामागची पार्श्वभूमी समजून न घेता दुसऱ्यांवर आरोप करणे म्हणजे स्वतःच्या राजकीय अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार सौरभ शिंदे यांनी केला आहे.

“शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर जर एक शब्द जरी बोलाल तर याद राखा”

“जागावाटपातच अन्यायाची भूमिका भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून करण्यात आली असल्याचा फटका सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये बसल्याने याची सर्वस्व जबाबदारी आमच्यावर जर कोणी मारत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही खबरदार आमचे दैवत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर जर एक शब्द जरी बोलाल तर याद राखा

महायुतीच्या जागावाटपाच्या प्रक्रियेत बाबाराजेंना अपेक्षित सन्मान आणि राजकीय महत्त्व दिले गेले नाही, अशी भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. ”

“भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून आणि महायुतीतील काही राजकीय हालचालींतून बाबाराजेंना दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. हा असंतोष केवळ निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेला नव्हता, तर जागावाटपाच्या प्रक्रियेपासूनच त्याची ठिणगी पडली होती. पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांनी ही नाराजी बाबाराजेंच्या कानावर घातली होती. मात्र, त्यांनी व्यक्तिगत राजकीय प्रतिष्ठेपेक्षा महायुतीचा धर्म आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द महत्त्वाचा मानला.”

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे जावळी सातारा मध्ये ४५० मतांची ताकद असूनही माघार घेण्याची मोठेपणा एक वरिष्ठ भाजपचे नेते म्हणून दाखवला; हा कमकुवतपणा नव्हे, मनाचा मोठेपणा! असल्याचे देखील सौरभ शिंदे यांनी नमूद केले

“जावळी सातारा मध्ये सुमारे ४५० मतांची ताकद असतानाही बाबाराजेंनी महायुतीतील समन्वय बिघडू नये, यासाठी माघार घेतली. केवळ मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान राखण्यासाठी आणि युतीतील एकजूट टिकवण्यासाठी त्यांनी आपल्या समर्थकांची समजूत काढली. अर्जुन काळे यांच्या उमेदवारीला प्रामाणिकपणे सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि त्यानुसार कार्यकर्त्यांनी कामही केले. मात्र, मतदारांच्या मनात असलेली नाराजी मतपेटीतून व्यक्त झाली. याचा अर्थ बाबाराजेंनी विरोधी भूमिका घेतली, असा काढणे म्हणजे वस्तुस्थितीपासून पळ काढण्यासारखे आहे.”

‘शिवेंद्रसिंहराजेंवर बोलण्याआधी महायुतीतील कुरघोड्यांचा हिशेब द्या!’

“शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका करण्याच्या आधी महायुतीतील कुरघोड्यांचा हिशेब द्या! मगच आपले वाचाळ तोंड उघडा… ज्यांनी जागावाटपात बाबाराजेंना दुय्यम स्थान मिळेल, अशी परिस्थिती निर्माण केली, ज्यांनी त्यांच्या राजकीय ताकदीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला, त्यांच्याच राजकारणाचा परिणाम मतदानातून दिसून आला. त्यामुळे जावळीतील मतांचा हिशेब मागण्यापूर्वी महायुतीतील वरिष्ठ पातळीवर नेमके काय राजकारण झाले, याचे आत्मपरीक्षण शेखर पाटोळे यांनी करावे. बाबाराजेंनी युतीचा शब्द पाळला, संयम दाखवला; पण कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी दडपून ठेवता येत नाही, हे या निकालाने दाखवून दिले आहे.”

“जयाभाऊंच्या संघर्षाचा आदर पण जावळीचा स्वाभिमान तितकाच मोठा!”

“जयाभाऊंच्या संघर्षाचा आदर; नक्कीच आहे पण जावळीचा स्वाभिमानही तितकाच मोठा! जर जावळीच्या स्वाभिमानाला आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाला कुठेही टीकेतून वाचाळ वाचा केली तर जावळीच्या स्वाभिमानाला कुठेही धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देण्याची आमची देखील तयारी आहे वेळ जागा ठरवा तिथे आम्ही येऊ.” असा इशारा देखील सौरभ शिंदे यांनी दिला आहे.

“जयकुमार गोरेंच्या राजकीय संघर्षाबद्दल आम्हाला कोणताही आक्षेप नाही. मात्र, संघर्षाची मक्तेदारी कोणाकडेही नाही. जावळीनेही अनेक राजकीय संघर्ष पाहिले आहेत आणि प्रसंगी मोठमोठ्या राजकीय शक्तींना आपली ताकद दाखवून दिली आहे. बाबाराजेंच्या पाठिंब्यामुळे राजकीय मैदानात उतरलेल्या लोकांनी आज त्याच जावळीला आत्मपरीक्षणाचे धडे देणे हास्यास्पद आहे. बाबाराजेंच्या मनाचा मोठेपणा म्हणजे त्यांची राजकीय ताकद कमी झाली, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये,” असेही प्रसिद्धी पत्रकात सौरभ शिंदे यांनी नमूद केले.

एकूणच, जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर जावळीतील राजकारण आता नव्या वळणावर आले असून महायुतीतील नेत्यांमधील नाराजी उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे.

Satara DCC Bank Election : ‘वरिष्ठांच्या सूचना देऊनही वेगळा निर्णय घेतला’; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादी-शिवसेनेबाबत मोठा खुलासा!

💡

Frequently Asked Questions

  • Que: जावळीतील जिल्हा बँक निवडणुकीवरून वाद का निर्माण झाला?

    Ans: जावळी मतदारसंघातून अर्जुन काळे यांना अपेक्षित मतदान न मिळाल्याने हा वाद सुरू झाला. शेखर पाटोळेंच्या टीकेनंतर सौरभ शिंदे यांनी महायुतीतील जागावाटपाच्या राजकारणाला यासाठी जबाबदार धरले.

  • Que: सौरभ शिंदे यांनी बाबाराजेंबाबत काय आरोप केला?

    Ans: महायुतीच्या जागावाटपात बाबाराजेंना अपेक्षित सन्मान आणि महत्त्व दिले गेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती, असा आरोप सौरभ शिंदे यांनी केला.

  • Que: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीत माघार का घेतली?

    Ans: सौरभ शिंदे यांच्या दाव्यानुसार, जावळी-सातारा भागात सुमारे ४५० मतांची ताकद असूनही शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा मान राखण्यासाठी आणि महायुतीतील समन्वय टिकवण्यासाठी माघार घेतली.

Web Title: Satara news mahayuti internal politics jawali shivendraraje bhosale vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • Mahayuti
  • Satara Bank
  • Satara News
  • Shivendra Raje Bhosale

संबंधित बातम्या

Shambhuraj Desai : ‘अघोरी बाबा कुठे मिळतो?’ शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना खोचक टोला; साताऱ्यात राजकारण तापलं!
1

Shambhuraj Desai : ‘अघोरी बाबा कुठे मिळतो?’ शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना खोचक टोला; साताऱ्यात राजकारण तापलं!

Pune Satara Highway Traffic:  पुणे-सातारा महामार्गावर ट्राफिक ; कात्रज ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा ताण
2

Pune Satara Highway Traffic:  पुणे-सातारा महामार्गावर ट्राफिक ; कात्रज ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा ताण

Satara DCC Bank Election : ‘वरिष्ठांच्या सूचना देऊनही वेगळा निर्णय घेतला’; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादी-शिवसेनेबाबत मोठा खुलासा!
3

Satara DCC Bank Election : ‘वरिष्ठांच्या सूचना देऊनही वेगळा निर्णय घेतला’; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादी-शिवसेनेबाबत मोठा खुलासा!

Satara News : पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही; पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा चालकांना थेट इशारा
4

Satara News : पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही; पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा चालकांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.