Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shambhuraj Desai : ‘अघोरी बाबा कुठे मिळतो?’ शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना खोचक टोला; साताऱ्यात राजकारण तापलं!

Shambhuraj Desai : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीतील राजकीय वातावरण तापलं आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या ‘जालीम औषध’ आणि ‘अघोरी बाबा’ वक्तव्याला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मिश्कील प्रत्युत्तर दिलं.

  • By विवेक
Updated On: Nov 21, 2026 | 09:16 PM
Jaykumar gore shambhuraj desai

Jaykumar gore shambhuraj desai

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं
  • जयकुमार गोरेंचं जालीम औषध आणि अघोरी बाबाचं वक्तव्य
  • शंभूराज देसाईंचा मिश्कील टोला
 

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात सध्या विधानांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. आधी शंभूराज देसाई यांनी ‘जालीम औषधा’चा उल्लेख केला, त्यावर जयकुमार गोरे यांनी ‘अघोरी बाबां’चा टोला लगावला. आता देसाई यांनीही यावर मिश्कील उत्तर देत गोरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.  (Shambhuraj Desai)

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची निवड झाली. या सत्तास्थापनेत भाजपला अपेक्षित पद मिळाले नसल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली.

या निवडीनंतर शंभूराज देसाई यांनी काही राजकीय जखमा खोलवर असतात आणि त्या जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, असं विधान केलं होतं. त्यावर जयकुमार गोरे यांनी अघोरी विद्येचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे देसाईंना लक्ष्य केलं.

Maharashtra Politics : भरत गोगावलेंनी मंत्रिपदाची ऑफर दिली अन् दुसऱ्याच दिवशी शिंदें थेट आमदाराच्या घरी! पंढरपुरात नेमकं काय घडलं?

‘अघोरी बाबा कुठे मिळतो?’ देसाईंचा खोचक सवाल

जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई म्हणाले की, हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे गोरे यांनाच विचारावं लागेल. त्यांना त्याचा इलाज लागू पडला असेल, तर मी त्यांच्याकडून माहिती घेईन, असा मिश्कील टोला त्यांनी लगावला.

११ पैकी ७ जागांचा दाखला देत देसाईंचं आव्हान

गोरे यांनी ‘दम होता तर निवडणूक लढवायची’ असं विधान केलं होतं. यावर उत्तर देताना देसाई म्हणाले की, आम्ही कधीही दमाची भाषा केलेली नाही. मात्र, कोणी वारंवार अशी भाषा करत असेल, तर आकडेवारीच सर्व काही स्पष्ट करते.

तालुक्यातील ११ पैकी ७ जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीने जिंकल्या आहेत. जिल्हा गटातील पाच जागांवरही हेच ठरावधारक मतदान करणार असल्याने आमची बाजू भक्कम आहे, असा दावा त्यांनी केला. या विषयावर जाहीर चर्चा करण्याचीही तयारी असल्याचं देसाईंनी स्पष्ट केलं.

महायुतीच्या विजयावर आनंद, पण राजकीय टोलेबाजी सुरूच!

महायुतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आल्याने सर्वच पक्ष आनंदी असल्याचं देसाई म्हणाले. जयकुमार गोरे हे मंत्रिमंडळातील सहकारी असल्याने त्यांच्याबद्दल अधिक भाष्य करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

मात्र, एका बाजूला महायुतीच्या एकजुटीची भाषा आणि दुसरीकडे मंत्र्यांमधील ही शाब्दिक टोलेबाजी पाहता सातारा जिल्ह्यातील राजकारण चांगलंच रंगताना दिसत आहे. आता जयकुमार गोरे या नव्या टीकेला काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; अमोल कोल्हे अन् छगन भुजबळ यांच्यात खलबतं, चर्चांना उधाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: सातारा जिल्हा बँक निवडणुकीवरून कोणत्या दोन मंत्र्यांमध्ये वाद सुरू आहे?

    Ans: मंत्री जयकुमार गोरे आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात वक्तव्यांवरून शाब्दिक संघर्ष सुरू आहे.

  • Que: शंभूराज देसाई यांनी जयकुमार गोरे यांना काय प्रत्युत्तर दिलं?

    Ans: ‘हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे गोरे यांनाच विचारावं लागेल. त्यांना इलाज लागू पडला असेल तर मी त्यांच्याकडून माहिती घेईन,’ असा मिश्कील टोला देसाई यांनी लगावला.

  • Que: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

    Ans: अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर आणि उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण यांची निवड झाली.

Web Title: Satara district bank election jaykumar gore shambhuraj desai controversy vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • Satara News
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Pune Satara Highway Traffic:  पुणे-सातारा महामार्गावर ट्राफिक ; कात्रज ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा ताण
1

Pune Satara Highway Traffic:  पुणे-सातारा महामार्गावर ट्राफिक ; कात्रज ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा ताण

Satara DCC Bank Election : ‘वरिष्ठांच्या सूचना देऊनही वेगळा निर्णय घेतला’; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादी-शिवसेनेबाबत मोठा खुलासा!
2

Satara DCC Bank Election : ‘वरिष्ठांच्या सूचना देऊनही वेगळा निर्णय घेतला’; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादी-शिवसेनेबाबत मोठा खुलासा!

Satara News : पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही; पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा चालकांना थेट इशारा
3

Satara News : पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही; पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा चालकांना थेट इशारा

Satara News: साताऱ्यात घर खरेदीसह गुंतवणुकीची संधी; साताऱ्यात २६ नोव्हेंबरपासून ‘रचना २०२६’ प्रदर्शन!
4

Satara News: साताऱ्यात घर खरेदीसह गुंतवणुकीची संधी; साताऱ्यात २६ नोव्हेंबरपासून ‘रचना २०२६’ प्रदर्शन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.