Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! महायुती सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्याच्या अडचणींत होणार वाढ; कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप

शिरसाट यांच्यावर होत असलेल्या आरोपांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. यापूर्वी सिडको, छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल आणि सामाजिक न्याय विभागाच्या निविदा प्रक्रियेवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 10, 2026 | 01:50 PM
मोठी बातमी ! महायुती सरकारमधील 'या' बड्या मंत्र्याच्या अडचणींत होणार वाढ; कोट्यवधींच्या घोटाळ्याचा केला गेला आरोप

मोठी बातमी ! महायुती सरकारमधील 'या' बड्या मंत्र्याच्या अडचणींत होणार वाढ; कोट्यवधींच्या घोटाळ्याचा केला गेला आरोप

Follow Us
Follow Us:

मुंबई : मनसे नेते अविनाश जाधव यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सुपूर्द केले असून, या संपूर्ण प्रकरणाची कडक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शिरसाट यांच्यावर होत असलेल्या आरोपांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. यापूर्वी सिडको, छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल आणि सामाजिक न्याय विभागाच्या निविदा प्रक्रियेवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता एका नव्या कथित घोटाळ्यावरून त्यांच्यावर आरोप झाले आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी आरोप केला की, शिरसाट यांच्या विभागात निधी वितरण, टेंडर प्रक्रिया आणि मंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि  घोटाळे केले जात आहेत.

मुख्य आरोप काय? अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

जाधव यांनी आपल्या पत्रात संजय शिरसाट यांचे खासगी सचिव भरत कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय विभागात काम करत असल्याचे पत्रात म्हटले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांतर्गत निधी वाटप प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाशी संबंधित कामांमध्ये ऑनलाईन टेंडर प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम (अॅडव्हान्स) घेऊन कामांचे वाटप केल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.

कामाच्या बदल्यात कमिशनची मागणी

जाधव यांनी आरोप केला की, मंत्रालयातील काही अधिकारी मंत्री कार्यालयाचा वापर करून काम मिळवून देण्याच्या बदल्यात आमदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींकडून कमिशनची मागणी करत आहेत. या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून सिद्धार्थ भंडारे यांची नियुक्ती व अधिकारांचीही चौकशी झाली पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे सामाजिक न्याय विभागाचे प्रशासन आणि निधी वाटप पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Web Title: Scam worth crores in sanjay shirsat department mns alleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • MNS Politics
  • political news
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.