Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teacher strike: शाळा बंद आंदोलन: राज्यातील २,५३९ शाळा बंद, २४,५४५ शिक्षक अनुपस्थित

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या उपस्थितीचा अहवाल संकलित केला असून, त्यानुसार राज्यातील तब्बल २ हजार ५३९ शाळा बंद राहिल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 07, 2025 | 05:55 PM
Maharashtra school protest,

Maharashtra school protest,

Follow Us
Close
Follow Us:
  • टीईटी सक्तीपासून जुनी पेन्शनपर्यंत मागण्या; राज्यभर व्यापक आंदोलन
  • राज्यातील तब्बल २ हजार ५३९ शाळा बंद
  • २४ हजार ५४५ शिक्षक आंदोलनामुळे शाळांमध्ये गैरहजर
Pune News: टीईटी सक्ती, संचमान्यता धोरण रद्द, जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, तसेच शिक्षणातील कंत्राटीकरण थांबवणे आदी मागण्यांसाठी राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी तब्बल २ हजार ५३९ शाळा बंद तर २४ हजार ५४५ शिक्षक गैरहजर राहून आंदोलन आले होते. शाळा बंद आणि गैरहजर शिक्षकांचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग संचालक डॉ. महेश पालकर यांनी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला.

Winter Session 2025: ऑफिसच्या वेळेनंतर बॉस तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही…; संसदेत डिस्कनेक्ट बिल सादर, नेमकं काय आहे यात?

 

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या उपस्थितीचा अहवाल संकलित केला असून, त्यानुसार राज्यातील तब्बल २ हजार ५३९ शाळा बंद राहिल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. तसेच, १३ हजार २१६ शिक्षक विनापरवानगी अनुपस्थित राहिले, तर ११ हजार ३२९ शिक्षक गैरहजर असल्याची नोंद आहे. एकूण २४ हजार ५४५ शिक्षक आंदोलनामुळे शाळांमध्ये हजर नसल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने ४ डिसेंबर रोजी सर्व शिक्षण अधिकारी, उपसंचालक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून स्पष्ट सूचना दिल्या होत्या. आंदोलनाचा मार्ग अवलंबल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असे शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच, ५ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा नियमितपणे सुरू राहाव्यात, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले होते.

UPSC criminal record rules: FIR झाल्यानंतरही सरकारी नोकरी मिळणार नाही? स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्वाची माहिती

यासोबतच, विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या किंवा संपात सहभागी होऊन शालेय कामकाजात अडथळा आणणाऱ्या शिक्षकांवर ‘काम नाही, वेतन नाही’ या तत्त्वानुसार तसेच नियमांनुसार शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता. त्या दिवशी सुरू असलेल्या शाळांची संख्या, शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती-अनुपस्थिती याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले होते.

शिक्षण विभागाने राज्यात २४ हजार ४९० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून, या शाळांमध्ये सुमारे २ लाख २४ हजार ३६६ शिक्षक कार्यरत आहेत. आंदोलनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात शिक्षक गैरहजर राहिल्यामुळे शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली आणि हजारो विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन खोळंबले.

 

Web Title: School shutdown protest 2539 schools closed 24545 teachers absent across maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • Teachers Strike
  • TET Exam
  • TET Protest

संबंधित बातम्या

‘टीईटी’ विरोधात जिल्हा कचेरीवर मोर्चा; निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करण्याची मागणी 
1

‘टीईटी’ विरोधात जिल्हा कचेरीवर मोर्चा; निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करण्याची मागणी 

युवा सामाजिक व शैक्षणिक संघटना आक्रमक, ‘या’ तारखेला नागपुरात करणार आंदोलन
2

युवा सामाजिक व शैक्षणिक संघटना आक्रमक, ‘या’ तारखेला नागपुरात करणार आंदोलन

२०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्या! शिक्षक सभेची राज्य शासनाकडे ठाम मागणी
3

२०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्या! शिक्षक सभेची राज्य शासनाकडे ठाम मागणी

Ahilyanagar News: शिक्षकांचा ‘टीईटी’ सक्तीला जोरदार विरोध! शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा
4

Ahilyanagar News: शिक्षकांचा ‘टीईटी’ सक्तीला जोरदार विरोध! शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.