Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! TET परीक्षेचा अंतिम निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष…

परीक्षा मंडळाने परीक्षेनंतर १६ जानेवारीला उत्तरसूची जाहीर करून उमेदवारांच्या लॉगीनमध्ये अंतरिम निकाल उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर गुणांची पडताळणी आणि निकालावर आक्षेप नोंदविण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 03, 2026 | 08:30 AM
मोठी बातमी ! TET परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष...

मोठी बातमी ! TET परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष...

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.३) जाहीर होणार असून, चार लाखांहून अधिक परीक्षार्थींचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. इतरवेळी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांचीच आता एकप्रकारे परीक्षा असणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर २०२५ ला राज्यभरात १ हजार ४२० परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. संपूर्ण राज्यभरातून ४ लाख ७५ हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यानंतर अंतिम निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. परिणामी, यंदा टीईटी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील वाढली असल्याने निकालाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : TET परीक्षेत वाशिम जिल्ह्यातील ९६ टक्के शिक्षक अनुत्तीर्ण! गुरुजी झालं नापास, नाराजीचे वातावरण

दरम्यान, परीक्षा मंडळाने परीक्षेनंतर १६ जानेवारीला उत्तरसूची जाहीर करून उमेदवारांच्या लॉगीनमध्ये अंतरिम निकाल उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर गुणांची पडताळणी आणि निकालावर आक्षेप नोंदविण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर आता आज अंतिम निकाल जाहीर होणार असून, प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकल्यामुळे प्रश्नाचे गुण वजा करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

२५० अनुत्तीर्ण उमेदवारांचे काय?

परीक्षेच्या दिवशी सीडीओ मेरी परीक्षा केंद्रात इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना मराठी माध्यमाचा पेपर देण्यात आला होता. उमेदवारांनी ही चूक निदर्शनास आणून देत इंग्रजी माध्यमाचा पेपर देण्याची मागणी करूनही मराठी माध्यमाचाच पेपर सोडवण्यास सांगण्यात आले. त्यामुळे उत्तरसूची निकालात हे २५० उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहे. त्यानंतर उमेदवारांनी आंदोलन करीत उत्तीर्ण करण्याची मागणी केली.

परीक्षा महामंडळाच्या निर्णयाकडे लक्ष

या आंदोलनानंतर परीक्षा मंडळाने अनुतीर्ण उमेदवाराना संपर्क साधून घडलेला प्रकार जाणून घेतला आहे. त्यामुळे या उमेदवाराबाबत परीक्षा मंडळाने काय निर्णय घेतला, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेदेखील वाचा : रेल्वे रुळांवरून पालिकेचा केबल-स्टेड पूल जाणार, ५५% काम पूर्ण; महालक्ष्मी-सात रस्ता…, पाहा नेमका मार्ग

Web Title: Tet exam results will be declared today 4 lakhs candidates across maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Maharashtra Education
  • TET Exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.