Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जत पंचायत समिती आवारात दोन गटांत धक्काबुक्की; आमदार गोपीचंद पडळकर व अॅड. विद्या मोटे समर्थकांमध्ये वाद

सांगलीच्या जत पंचायत समिती आवारात आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना नेत्या अॅड. विद्या मोटे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद आणि मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जतच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 25, 2026 | 09:54 PM
जत पंचायत समिती आवारात दोन गटांत धक्काबुक्की

जत पंचायत समिती आवारात दोन गटांत धक्काबुक्की

Follow Us
Close
Follow Us:

 

  • जत पंचायत समिती आवारात दोन गटांत धक्काबुक्की
  • आमदार गोपीचंद पडळकर व अॅड. विद्या मोटे समर्थकांमध्ये वाद
  • मारहाणीच्या चर्चेने खळबळ!
जत : जत येथील पंचायत समिती आवारात आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि शिवसेना नेत्या अॅड. विद्या मोटे यांच्या समर्थकांमध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडल्याची चर्चा शहरात सुरू आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद पुढे धक्काबुक्की आणि मारहाणीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती परिसरात दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. तुम्ही विद्या मोटे यांना जतमध्ये का घेऊन आलात तसेच समाजामध्ये भांडणे लावू नका अशा कारणांवरून हा वाद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचेही बोलले जात आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संबंधित मारहाण झालेल्या व्यक्तीकडून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार जत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान, या घटनेबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून पोलिसांकडूनही कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. तरीही पंचायत समिती परिसरातील या कथित प्रकारामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Sangli News : जतमध्ये यात्रेवर काळाचा घाला! भिंत कोसळून ६ भाविकांचा अंत

विद्या मोटे यांच्या सक्रियतेमुळे जतच्या राजकारणात नवी समीकरणे?

जत तालुक्यात शिवसेना नेत्या अॅड. विद्या मोटे यांच्या वाढत्या दौऱ्यांमुळे आणि आपत्तीग्रस्त भागातील भेटींमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर त्या आक्रमक भूमिका घेत असल्याने त्यांचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंचायत समिती परिसरात आमदार गोपीचंद पडळकर समर्थक आणि विद्या मोटे समर्थकांमध्ये झालेल्या कथित वादानंतर विद्या मोटे यांच्या एंट्रीमुळे आमदार पडळकर यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

मात्र, या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दोन्ही बाजूंकडून देण्यात आलेली नाही. तरीही आगामी स्थानिक राजकारणात विद्या मोटे यांच्या वाढत्या सक्रियतेचा परिणाम दिसू शकतो, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Sangli: गोपीचंद पडळकर ट्रम्प लेव्हलचे नेते, कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांचा खोचक टोला

Web Title: Scuffle erupts between two factions on jat panchayat samiti premises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:54 PM

Topics:  

  • gopichand padalkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.