Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gopichand Padalkar : अध्यक्ष निवडीवेळी नवरदेव होणारे, आता चीनला पळाले! गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

Gopichand Padalkar : सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. बँकेतील एकहाती कारभाराला भाजप आव्हान देणार असून शेतकरीहिताच्या आड येणाऱ्या निर्णयांना विरोध करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 18, 2026 | 08:11 PM
Gopichand Padalkar : अध्यक्ष निवडीवेळी नवरदेव होणारे, आता चीनला पळाले! गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

Gopichand Padalkar : अध्यक्ष निवडीवेळी नवरदेव होणारे, आता चीनला पळाले! गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा बँकेतील एकहाती कारभाराला आव्हान देणार
  • शेतकरीहिताच्या आड येणाऱ्यांना सोडणार नाही
  • कर्जपुरवठ्यात युवकांनाही प्राधान्य द्या
 

Gopichand Padalkar : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार राजकीय निशाणा साधला. अध्यक्ष निवडीच्या वेळी नवरदेवाप्रमाणे उपस्थित राहणारे जयंत पाटील आता चीनला पळाले आहेत, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली.
जिल्हा बँकेतील एकहाती कारभाराला आता भाजप आव्हान देणार असून, शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय झाल्यास ठाम विरोध केला जाईल, असा इशाराही पडळकर यांनी यावेळी दिला.

जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना पडळकर म्हणाले, महेंद्र लाड चांगल्या पद्धतीने बँकेचा कारभार चालवतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, मागील काळाप्रमाणे चुकीच्या पद्धतीने कारभार झाल्यास भाजप गप्प बसणार नाही. बँकेतील सत्तेचे केंद्रीकरण चुकीचे असून, जयंत पाटील यांच्या एकहाती कारभाराला आता काँग्रेसही आव्हान देत आहे. यामध्ये भाजपची भूमिका महत्त्वाची आहे.

दुष्काळाचे कारण पुढे, निवडीवेळी चर्चेला बगल!

जयंत पाटील यांच्या भूमिकेवर टीका करताना पडळकर म्हणाले, निवडणुका घ्यायची वेळ आली की, दुष्काळाचे कारण पुढे करायचे आणि अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची वेळ आली की, चर्चेलाच बगल द्यायची, हा दुटप्पी कारभार सर्वांनी पाहिला आहे. जयंत पाटील यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. बँकेचा कारभार यापुढे ठरावीक लोकांच्या हातात केंद्रित राहणार नाही.

Shivendrasinhraje Bhosale : जिल्हा बँकेच्या पराभवाचे खापर माझ्यावर नको! शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप नेत्यांना इशारा

कर्जपुरवठ्यात युवकांनाही प्राधान्य द्या

बँकेच्या माध्यमातून कारखानदारांना विविध प्रकारची कर्जे मिळतात; मात्र तरुणांना व्यवसाय आणि रोजगारासाठी वैयक्तिक लाभाची कर्जे मिळाली पाहिजेत. युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली.

ते पुढे म्हणाले, संचालक झाल्यामुळे बँकेच्या कारभाराची अधिकची कागदपत्रे मिळवणे आता सोपे होणार आहे. मी स्वतः कोणतेही बँकेचे कर्ज घेणार नाही. माझी भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल. बँकेचा कारभार चांगला चालविण्यासाठी सहकार्य करू; मात्र शेतकरीहिताला बाधा आणणाऱ्या निर्णयांना विरोधही करू. प्रस्थापितांच्या हातातून विस्थापितांच्या हातात कारभार येणे, हे भाजपचे यश असल्याचा दावाही त्यांनी केला.

Arrested ACB: लोकांचे रक्षण करणारा खाकीतला खाकीच विकला गेला! पीएसआय २० हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद!

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर कोणती टीका केली?

    Ans: अध्यक्ष निवडीवेळी नवरदेवाप्रमाणे उपस्थित राहणारे जयंत पाटील आता चीनला पळाले आहेत, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला.

  • Que: सांगली जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत पडळकरांनी काय इशारा दिला?

    Ans: बँकेतील एकहाती कारभाराला भाजप आव्हान देणार असून चुकीच्या पद्धतीने कारभार झाल्यास पक्ष गप्प बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • Que: जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांकडून पडळकरांना काय अपेक्षा आहे?

    Ans: महेंद्र लाड यांनी चांगल्या पद्धतीने बँकेचा कारभार चालवावा, अशी अपेक्षा पडळकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Gopichand padalkar criticizes jayant patil sangli district bank rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • jayant patil
  • sangali

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: कचरा, रद्दी आणि अतिक्रमणाचे साहित्य अखेर हटणार! मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या स्वच्छतेला सुरुवात
1

Navarashtra Impact: कचरा, रद्दी आणि अतिक्रमणाचे साहित्य अखेर हटणार! मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या स्वच्छतेला सुरुवात

सांगलीतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था; रंगमंचापासून स्वच्छतागृहापर्यंत सगळेच खराब
2

सांगलीतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था; रंगमंचापासून स्वच्छतागृहापर्यंत सगळेच खराब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.