गोपीचंद पडळकर ट्रम्प लेव्हलचे नेते, कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांचा खोचक टोला (Photo Credit- X)
काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी विश्वजीत कदम यांच्यावर निशाणा साधत, विशाल पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही हे माहीत असूनही कदम यांनी केवळ राजकीय ‘हवा’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले होते.
या टीकेला प्रत्युत्तर देताना विश्वजीत कदम यांनी पडळकरांवर उपरोधिक शब्दांत टोला लगावला. “पडळकर महान नेते आहेत, आम्ही लहान आहोत, ते डोनाल्ड ट्रम्प लेव्हलचे नेते आहेत आमची मजल महाराष्ट्र देश इतकेच आहे,” असे म्हणत त्यांनी पडळकरांना “महाराष्ट्राचे डोनाल्ड ट्रम्प” असे संबोधले. या वक्तव्यांमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोन्ही नेत्यांमधील वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, सांगलीच्या राजकारणात सुरू असलेली ही शब्दयुद्धाची मालिका सध्या चर्चेचा विषय ठरत असून, पुढील काही दिवसांत यावर आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा दणका; सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू






