मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी 158 कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी मंत्री मुश्रीफ यांचा मुलगा, जावई आणि इतर 7 जणांविरुद्ध पोलीस एफआयआर नोंदवून चौकशी, कारवाई करतील, अशी अपेक्षा सोमय्या यांनी ट्विट करून व्यक्त केली(Seize Hassan Mushrif’s anonymous assets; Demand for Kirit Somaiya).
तसेच या प्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने कठोर कारवाई करावी, यासाठी मी पाठपुरावा करत असल्याचे सांगतानाच मुश्रीफ यांची 100 कोटींपेक्षा अधिक संपत्ती बेनामी असून त्यांची बेनामी संपत्ती जप्त करण्याची मागणीदेखील सोमय्या यांनी केली.
हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे. त्यांची पवार, ठाकरे यांनी का चौकशी केली नाही? केंद्र सरकारच्या कंपनी मंत्रालयाने अधिकृत फौजदारी प्रक्रियेची याचिका दाखल केली आहे. एक एक मंत्री घोटाळ्यात सापडत आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ, संजय राऊत व अजित पवार ही सगळीच नावे घोटाळ्यातील आहेत. हे घोटाळे सिद्ध होत आहेत. तरीही मुख्यमंत्री म्हणून ठाकरे काहीही कारवाई करायला तयार नाहीत असा आरोपही सोमय्यांनी केला.
मुख्यमंत्री ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कारवाई करणार नाहीत. ते स्वतःच घोटाळेबाज आहेत. त्यामुळे एक घोटाळेबाज दुसऱ्या घोटाळेबाजाला मदत करत असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. पुण्यात प्राप्तिकर सदनमध्ये शुक्रवारी मुश्रीफ यांच्या विरोधात आयकर विभागाकडे केलेल्या तक्रारीचे काय झाले, याची विचारणा करण्यासाठी गेले होते, असेही त्यांनी सांगितले.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]






