Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसच्या ‘त्या’ आमदारांच्या चौकशी करणार दिल्लीचे वरिष्ठ नेते

सोमवारी विधानसभेत शिंदे सरकारवर सकाळी अकरा वाजता विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. हा ठराव सभागृहात मांडला आणि मतदानासाठी सभागृहाची दारे बंद करून घेण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचे काही आमदार विधान भवनात पोहोचले पण त्यांना सभागृहात जाता आले नाही.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 08, 2022 | 07:58 PM
काँग्रेसच्या ‘त्या’ आमदारांच्या चौकशी करणार दिल्लीचे वरिष्ठ नेते
Follow Us
Follow Us:

मुंबई : विधानसभेत (VidhanSabha) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील (Floor Testing) मतदानावेळी (Voting) काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते (Congress’s 11 MLA Present). मतदानावेळी सभागृहात अनुपस्थित असणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य ७ आमदारांना पक्षाने नोटीस बजावली (Show Cause Notice) आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी मोहन प्रकाश (Mohan Prakash) यांची नियुक्ती (Appointment) केली आहे. या आमदारांशी बोलून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

सोमवारी विधानसभेत शिंदे सरकारवर सकाळी अकरा वाजता विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. हा ठराव सभागृहात मांडला आणि मतदानासाठी सभागृहाची दारे बंद करून घेण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचे काही आमदार विधान भवनात पोहोचले पण त्यांना सभागृहात जाता आले नाही. परिणामी विधानसभा अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा महाविकास आघाडीच्या बाजूने ९ कमी मते पडली.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘‘अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी, असे विधान केले होते. या घडामोडीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्टाचे प्रभारी एच.के. पाटील यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. तसेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.

[read_also content=”टोयोटाची मुंबईत बी-एसयूव्ही ‘द अर्बन क्रूझर हायराइडर – सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल’ लाँच https://www.navarashtra.com/automobile/toyota-launches-b-suv-the-urban-cruiser-hyryder-self-charging-strong-hybrid-electric-vehicle-in-mumbai-nrvb-302157.html”]

काँग्रेस नेतृत्वाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली असून बहुमत चाचणीला गैरहजर असलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे. मतदानावेळी अनुपस्थित असलेल्या ११ पैकी ९ आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या न्यूयॉर्कला असल्यामुळे आणि जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने या दोन आमदारांनी उपस्थित राहू शकणार नसल्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे हे दोन आमदार वगळता अन्य ९ आमदारांना पक्षाने नोटीस पाठविली आहे.

काँग्रेसच्या ९ आमदारांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर या संदर्भात पुढील निर्णय काय असेल यासाठी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत.

बहुमत चाचणीसाठी अनुपस्थित आमदार :

⇒ अशोक चव्हाण
⇒ विजय वडेट्टीवार
⇒ झिशान बाबा सिद्दीकी
⇒ धीरज विलासराव देशमुख
⇒ कुणाल पाटील
⇒ राजू आवळे
⇒ मोहन हंबर्डे
⇒ शिरीष चौधरी
⇒ माधवराव जवळगावकर

Web Title: Senior delhi leaders will send show cause notice those congress mlas who are coming late nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2022 | 07:57 PM

Topics:  

  • Ashok Chavan
  • Congress
  • Show Cause Notice
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

‘जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा’; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा
1

‘जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा’; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा

‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर, वडेट्टीवारांचे मोठे विधान
2

‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर, वडेट्टीवारांचे मोठे विधान

‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
3

‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Nana Patole: नाना पटोले यांचे पाय धुतानाचा Video व्हायरल, भाजप नेत्यांचा हल्लाबोल; तर काँग्रेस पदाधिकाऱ्याने चांगलेच सुनावले
4

Nana Patole: नाना पटोले यांचे पाय धुतानाचा Video व्हायरल, भाजप नेत्यांचा हल्लाबोल; तर काँग्रेस पदाधिकाऱ्याने चांगलेच सुनावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.