सध्या राज्यात वारीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. विठ्ठल भक्तीरसात न्हाऊन जात असताना आता या आनंदाला गालबोट लागणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध किर्तनकार हभप नारायण तराळे यांचं वृद्धपकाळाने वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले आहे. अकोल्याचे नारायण ते हे प्रसिद्ध किर्तनकार होते. त्यांच्या जाण्याने अकोले आणि परिसरात शोककळा पसरली आहे. वारीच्या दिवसात तराळे यांचं वैकुंठवासी जाण्याने वारकरी संप्रदयातून शोक व्यक्त केला जात आहे. हभप नारायण तराळे हे प्रसिद्ध किर्तनकार असून त्यांनी किर्तन आणि भजनांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा अखंडीत सुरु ठेवला होता.
त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी पायी चालत पंढरीची वारी केली होती.वारकरी संप्रदायातील त्यांचे ‘विरह अभंग’ खूप प्रसिद्ध आहेत. हभप नारायण महाराज तराळे यांनी बाळापूर तालुक्यात राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. लहानपणापासून भक्तीमय वातावरणात वाढलेले नारायण तराळे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत विठ्ठलभक्ती कायम ठेवली. उद्या त्यांच्यावर राहत्या घरी अंत्यसंस्कार होणार आहेत. सलग 60 वर्ष त्य़ांनी वारी अखंडीत सुरु ठेवली होती. त्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली आहे.