'त्या' सरकारी वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी आता थेट न्यायाधीशांवरच गुन्हा दाखल; प्रशासनात एकच खळबळ
यवतमाळ : एका 15 वर्षीय मुलीवर विनयभंग व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सोमवारी (दि. 26) जिल्हा न्यायाधीश-1 व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला आहे. प्रशांत बंडू थुल (रा. गव्हळा ता. बाभूळगाव) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी खेळता खेळता घरात आली अन् नराधमाने…
शुक्रवारी (दि. 23) पीडिता नेहमीप्रमाणे शाळेत जात होती. शाळा सुटल्यानंतर बाभूळगाव तालुक्यातील गव्हळा येथील प्रकरण पीडिता व तिची मैत्रीण घरी जाण्यासाठी बस ची वाट पाहत होत्या. बऱ्याच वेळानंतर बस आली. सायंकाळी 7.15 वाजताच्या सुमारास यवतमाळ येथील स्टेट बँक चौकात एस. टी. बस थांबली.
काही प्रवाशी बसमध्ये चढल्यानंतर आरोपी हा शेवटी बसमध्ये चढताना आरोपीने बालिकेचा विनयभंग केला. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. तिने सदर घटनेबाबत तिचे आई-वडिलांना सांगितले. सदर घटनेची तक्रार यवतमाळ येथील पोलिस स्टेशनमध्ये केली. त्यानुसार, आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष सत्र न्यायाधीश, यवतमाळ यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. त्याविरूध्द विशेष खटला चालविण्यात आला. दर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी प्रशांत बंडू थूल याला 2 वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा तसेच 1000 रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिण्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
हेदेखील वाचा : मुंबईकरांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक; आत्ताच प्रवासाचं नियोजन करा